Sunday, August 26, 2018


संगमेश्वर तालुक्याकडे स्थानिक लोकसेवकांचा दुर्लक्षित कारभार
देवरुख - साखरपा मार्गावरील खड्डयांकडे कानाडोळा
संगमेश्वर(अमोल गायकर)- संगमेश्वर पासून देवरुख आणि देवरुख ते साखरपा या मार्गावर नेहमीची वर्दळ असते. शासकिय कार्यालय, बाजारपेठ आणि अनेक महत्त्वाच्या कामासाठी देवरुख शहर गजबजलेले असते.सदर मार्गावरून अनेक भाविक गणपतीपुळे,मार्लेश्वर या ठिकाणी मुंबईहुन तसेच अनेक ठिकाणाहून येत असतात.त्यांनाही या मार्गावरील पडलेल्या धोकादायक खड्यांमुळे खूप त्रास सहन करावा लागतो.यामुळे कोकणच्या पर्यटनावर फरक पडत आहे.स्थानिक आजी-माजी लोकसेवक या मार्गावरून जातात परंतु त्यांचाही आता संबंध संपला असा हावभाव असल्याचे भासते.
       देवरुख बाजारपेठ म्हटले की,डोळयांसमोर संपूर्ण तालुका एकत्र आल्याचे चित्र दिसते. विविध भागांतील लोक या बाजारात येतात. याच बाजारपेठेच्या बाजूला "सप्तलिंगी" नदीच्या पुलावर खड्यात रस्ता की रस्त्यातील खड्डे आहेत हेच कळायला मार्ग नाही. अनेक जेष्ठ नागरिक तसेच अनेकांना या मार्गावरून प्रवास केल्यामुळे मणक्याच्या आजाराला आणि अंगदुखी ला बळी पडायला भाग पाडले आहे. याच्याच पुढे मैत्री पेट्रोल पंप ते मार्लेश्वर मार्गावर असंख्य मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघातासारख्या घटना वाढल्या आहेत. या खड्डेमय मार्गामुळे होणाऱ्या जीवित हानी कोण जबाबदार? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. देवरुख साखरपा मार्ग मुख्य असल्यामुळे दुसरा पर्याय नाही. या दयनीय अवस्थेला आम्ही चुकीचा लोकसेवक निवडला तसेच येणाऱ्या निवडणुकीला आमचा त्रास भरून काढू असे स्थानिकांनी मत व्यक्त केले.पालकमंत्री,खासदार ,आमदार यांचे संपूर्ण दुर्लक्षित कारभार आहे आणि सरकारी अधिकारी खुर्च्या सांभाळून ऐन पावसाच्या सुरवातीला कामे सुरू करतात.विकासासाठी प्राप्त होणारा निधी आणि त्याचा उपयोग योग्य रित्या न होता आपआपले खिसे भरण्यात आणि खुर्ची सांभाळण्यात गुंतलेले हे लोकसेवक आणि अधिकारी काय कामाचे? असा संताप स्थानिकांमध्ये निर्माण झाला आहे.
      या खड्डेमय रस्त्यांमुळे होण्याऱ्या जीवितहानी ला संपूर्ण जबाबदार हे लोकसेवक आणि अधिकारी आहेत. आपण आपले बहुमूल्य मत यांना देतो आणि निवडून आल्यावर हे लोकसेवक असूनसुद्धा विसरून जातात. अपघातामध्ये होणाऱ्या जीवितहानी ला यांना जबाबदार धरून यांच्यावर कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हे दाखल झाले पाहिजेत.
-भाई अमोल गायकर
सामाजिक कार्यकर्ता 
द ग्रुप 

Tuesday, August 21, 2018

गुरूदास_कामत यांचे हृदयविकारांने दु:खद निधन.

#काँग्रेस_ज्येष्ठ_नेते_गुरूदास_कामत यांचे हृदयविकारांने दु:खद निधन.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

Wednesday, August 15, 2018

गांधी विचार परीक्षेत ‘डॉन’ अरुण गवळीने(डॅडी) चक्क पहिला क्रमांक पटकावला आहे.


नागपूर (सा.लो.प्र) - लगे रहो मुन्नाभाई चित्रपटात भाईगिरी करणाऱ्या मुन्नाभाईवर गांधी विचारांचा प्रभाव पडल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण आता असा प्रकार प्रत्यक्षातही घडला आहे. अंडरवर्ल्ड डॉन असलेल्या अरुण गवळीवर सध्या गांधीगिरीचा  प्रभाव झाल्याचे दिसतोय. नागपूरच्या कारागृहात घेण्यात आलेल्या गांधी विचार परीक्षेत ‘डॉन’ अरुण गवळीने चक्क पहिला क्रमांक पटकावला आहे.  
गुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना कारागृहात पाठविण्यात येते. यात हत्या, दरोडे, बलात्कार सारखे गंभीर गुन्हे करणाºया कैद्यांना डांबले जाते. शिक्षा भोगल्यानंतर या कैद्यांमध्ये खरोखरच परिवर्तन होते का, हा खरा प्रश्न आहे. कारागृह ही शिक्षा भोगण्यापेक्षा कैद्यांसाठी प्रायश्चित्त करण्याचे स्थान असावे ही महत्त्वाची संकल्पना आहे. कदाचित याचा विचार करून कारागृहात  शिक्षणातून परिवर्तन घडविण्यासाठी गांधी विचार परीक्षेला प्रोत्साहन देण्यात आले आहे. दरवर्षी या कारागृहातील अनेक बंदिजन परीक्षा देतात. यावर्षीही परीक्षा घेण्यात आली. यामध्ये १६० कैद्यांनी सहभाग नोंदविला. त्यांना अभ्यासासाठी गांधी विचारांची पुस्तकं पुरविण्यात आली. नागपूरच्या कारागृहातील अंडासेलमध्ये शिक्षा भोगणाºया डॉन अरुण गवळी यानेही ही परीक्षा दिली. त्याला पुरविलेल्या साहित्यातून गांधीजींचे विचार आत्मसात केले आणि ही परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली.  गांधीजींचे विचार हे अहिंसेचे आहेत, याच विचारांची भीती इंग्रजांनाही होती. अरुण गवळी याचे व्यक्तिमत्त्व  गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, यातून दहशत निर्माण केली होती. आता परीक्षेच्या माध्यमातून का होईना हा डॉन गांधी विचाराशी जुळला आहे. मात्र, परीक्षा पास करणे आणि हे विचार प्रत्यक्ष आचरणात आणणे यात फरक आहे. चित्रपटात गांधी विचारांना आत्मसात करणारा ‘मुन्नाभाई’ बदलला, असाच बदल अरुण गवळीत होणार का? तुरुंग फोडणा-या कैद्यांनीही मारली बाजी  ३१ मार्च २०१५ च्या मध्यरात्री नागपूर मध्यवर्ती कारागृहातून मोक्काचे पाच कुख्यात कैदी कारागृह सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले होते. या कैद्यांनी तेव्हा अख्खी पोलीस यंत्रणा हादरवून सोडली होती. हे कैदी सध्या नागपूर कारागृहात आहेत. त्यांनीही गांधी विचाराची परीक्षा दिली होती. तेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे.   गांधी विचार बंदिवानांसाठी लाभदायी  सहयोग ट्रस्ट, सर्वोदय आश्रम नागपूर आणि मुंबई सर्वोदय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांसाठी गांधी विचार परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा बंदिवानांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी तसेच आचारविचारात आमूलाग्र परिवर्तन घडवून आण्यासाठी लाभदायी ठरत आहे. त्यातून बंदिजनांच्या वागणुकीत सकारात्मक बदल घडत आहे.  -राणी भोसले, अधीक्षक, नागपूर कारागृह

Tuesday, August 14, 2018

जय हिंद म्हणून कॉमेंट करायला विसरू नका

आज १५ ऑगस्ट २०१८ , आज भारतात सगळीकडे 72 व्या स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम.

Thursday, August 9, 2018

नालासोपार्‍यातून ८ देशी बॉम्‍बसह स्‍फोटके जप्‍त, आरोपी सनातनचा साधक?

 नालासोपार्‍यातून ८ देशी बॉम्‍बसह स्‍फोटके जप्‍त, आरोपी सनातनचा साधक?

मुंबई 10/08/2018 (सा.पु.प्र)नालासोपारा भांडार आळीत राहणाऱ्या सनातन संस्थेचे कार्यकर्ते वैभव राऊत यांच्या घरी गुरवारी रात्री ATS  ने धाड टाकून मोठ्या प्रमाणात स्पोटके जप्त केली आहेत. 
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव राऊत यांच्या घरातून ८ देशी बॉम्ब मिळाले आणि त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका दुकानात बॉम्‍ब बनवण्याची सामग्री मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली आहे.  सांगण्यात येत आहे की ही सामग्री गन पावडर, सल्फर  आणि डिटोनेटर असून, त्यांच्यापासून दोन डझनहून अधिक बॉम्ब बनविण्यात येऊ शकतील. 

वैभव राऊत यांनी ही विस्फोटके का आणि कशी जमा केली? विशेष म्हणजे  ही सामग्री सापडल्याने या घटनेची तीव्रता अधिक वाढली आहे. वैभव हा सनातनी विचारधारेचा असून कुठे घातपात करण्याचा डाव होता का? याबाबत अजून कोणतीही माहिती मिळाली नाही. 
एटीएसची टीम गेल्या काही दिवसांपासून सतत पाळत ठेऊन होते आणि शेवटी गुरूवारी रात्री राऊत याच्या घरी धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याची घरीच कसून तपासणी सुरू आहे. श्वान पथक फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी उपस्थित आहे. याबाबत अधिकृत माहीती एटीस अधिकारी देत नाहीत.

Wednesday, August 8, 2018

शिवबा संघटनेच्या ‘त्या’ चार मावळ्यांच्या भव्यदिव्य कौतुक,मा.निलेशजी राणे उपस्थित

#कोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधमांवर भर कोर्टात हल्ला करणाऱ्या #शिवबा संघटनेच्या ‘त्या’ चार मावळ्यांच्या भव्यदिव्य कौतुक सोहळ्याला #जालना अंबड येथे महाराष्ट्र #स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार  #निलेशजी #राणे उपस्थित होते.

Tuesday, August 7, 2018

जय हिंद,भावपूर्ण श्रद्धांजली

भारतीय सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना
#मेजर_कौस्तुभ_राणेयांना  #वीरमरण

शहीद कौस्तुभ राणे हे #वैभववाडीतील_सडुरे गावचे सुपूत्र. सडूरे माजी सरपंच विजय रावराणे यांचे ते पूतणे होतं. मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे ( ३४)
यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, पत्नी आणि दीड वर्षांचा मुलगा असा परिवार परिवार आहे.

मीरारोड सह सिंधुदुर्ग जिल्ह्यावरही कोसळली शोककळा.


Tuesday, July 31, 2018


भावपूर्ण श्रद्धांजली

अचानक संकट यावं
एकत्रच सर्वांना न्यावं
माघारी कोणी रडायला नसावं
काळजावर झालाय घाव
कसा सोडून गेला माझा भाव
जास्त शब्द माझ्याकडे उरलेच नाही रे.
मी स्वप्नांत विचार करू शकत नाही की तुमच्या साठी मला अशी कविता करावी लागेल.
खूप चुकीचा वागलात तुम्ही.
दादा आयुष्यात खूप काही शिकवून गेलात
तुमची आठवण विसरणे अशक्य.
अमोल गायकर आणि परिवारातर्फे आपणांस
भावपूर्ण श्रद्धांजली

Monday, July 30, 2018

दिल तो बच्चा हैं जी(7 नामांकन - झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस )


दिल तो बच्चा हैं जी
(7 नामांकन - झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस )
एक धम्माल विनोदी नाटक
तृप्ती प्रॉडक्शन निर्मित
अशोक दगडू शिगवण सहर्ष सादर करीत आहेत.
दिल तो बच्चा हैं जी|
लेखक-अक्षय जोशी
दिग्दर्शक-प्रसाद खांडेकर
नेपथ्य-संदेश बेंद्रे
संगित-अमीर हडकर
प्रकाश-शितल तळपदे
7 नामांकन प्राप्त
सर्वोत्कृष्ट नाटक
सर्वोत्कृष्ट लेखक - अक्षय जोशी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- प्रसाद खांडेकर
सर्वोत्कृष्ट अभिनेता- पॅडी कांबळे
सर्वोत्कृष्ट अभिनेता - सुशिल इनामदार
सर्वोत्कृष्ट अभिनेती - रसिका वेंगुर्लेकर
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- प्रसाद खांडेकर


Saturday, July 28, 2018

रायगड(पोलादपूर):बस खोल दरीत कोसळून ३३ ठार

पोलादपूर: (सा.म.टा)-महाबळेश्वरला पिकनिकसाठी निघालेली दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस पोलादपूर येथील आंबेनळी घाटात ५०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३३ जण ठार झाले आहेत तर एक कर्मचारी सुदैवाने या अपघातातून बचावला आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच सर्वच यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले असून आतापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
कोकण कृषी विद्यापीठाचे हे कर्मचारी खासगी बसने पिकनिकसाठी महाबळेश्वरला निघाले होते. सकाळी साडसहा वाजता कृषी विद्यापीठातून बस रवाना झाल्यानंतर काही तासांतच पोलादपूर येथील आंबेनळी घाटात या सर्वांवर काळाचा घाला पडला. भीषण अपघातात बसचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून या अपघातातून केवळ प्रकाश सावंत-देसाई हे बचावले आहेत. काही तरी विपरीत घडत असल्याचं लक्षात येताच सावंत यांनी बसमधून उडी मारल्याने ते बचावले आणि या अपघाताची माहिती समोर आली. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर येथील काही ट्रेकर्सनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केलं असून प्रवाशांच्या बचावासाठी सर्वच यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या ठिकाणी बचावकार्य सुरू असल्याने पोलादपूर घाटात वाहतूक थांबविण्यात आली आहे. त्यामुळे घाटामध्ये वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असून वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. या अपघातात आतापर्यंत ३३ जण ठार झाल्याची माहिती जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिली.
अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत-देसाई
दरवर्षी विद्यापीठातील क्लरिकल स्टाफ पिकनिकसाठी जातो. आज सकाळी साडेसहा वाजता विद्यापीठाच्या आवारातून पिकनिकसाठी बस निघाली. त्यावेळी फोटोही काढण्यात आला. त्या फोटोतील कर्मचाऱ्यांची संख्या मोजली असता ती ३२ इतकी आहे तर अन्य दोघे चालक आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे एक संचालक डॉ. संजय भावे यांनी दिली. विद्यापीठ प्रशासनाला सकाळी साडेदहा वाजता या अपघाताची माहिती मिळाली. अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत-देसाई यांनी यांनी फोन करून ही माहिती दिल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, आमदारांना आम्ही अपघाताची माहिती दिली. आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली असून आम्ही घटनास्थळाकडे जाण्यासाठीच रवाना झालो आहोत, असेही त्यांनी सांगितले. 
ग्रामस्थांनी बस दरीत कोसळल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलादपूर आणि साताऱ्यातील सर्वच यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू केले आहे. महाबळेश्वर येथील ट्रॅकर्सना बोलावून हे बचाव कार्य सुरू आहे.
काळजाचा थरकाप उडवणारे मदतकार्याचे दृष्य 
मुसळधार बरसणारा पाऊस आणि बघ्यांनी केलेली तुफान गर्दी यामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण येत आहे. घटनास्थळी पोलिसांची अत्यंत कमी कूमक असल्याने त्यांना गर्दीला आवरण अशक्य झाल्याचं सूत्रांनी सांगितलं
दापोली बंद 
अपघाताचं वृत्त येताच रत्नागिरीवर शोककळा पसरली आहे. दापोलीत तर सर्वच बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. 
अपघातातील मृतांची नावे 
>> राजेंद्र बंडबे 
>> हेमंत सुर्वे 
>> सुनील कदम 
>>रोशन तबीब 
>> संदीप सुवरे 
>> प्रमोद जाधव 
>> विनायक सावंत 
>> गोरक्षनाथ तोंडे 
>> दत्ताराम धायगुडे 
>> रत्नाकर पागडे 
>> प्रमोद शिगवण 
>> संतोष जालगावकर 
>> शिवदास आगरे 
>> सचिन गिम्हवणेकर 
>> राजेंद्र रिसबूड 
>> सुनील साटले 
>> रितेश जाधव 
>> पंकज कदम 
>> निलेश तांबे 
>> संतोष झगडे 
>> अनिल सावके 
>> संदीप भोसले 
>> विक्रांत शिंदे 
>> सचिन गुजर 
>> राजाराम गावडे 
>> राजेश सावंत 
>> सचिन झगडे 
>> रवीकिरण साळवी 
>> संजीव झगडे 
>> सुशय बाळ 
> राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली 
शोकाकुल परिवारांसोबत माझ्या संवेदना आहेत असे ट्विट करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रद्धांजली वाहिली. 
> पोलादपूर दुर्घटनेबाबात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक 
मदतकार्यावर मुख्यमंत्र्यांची नजर 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. स्थानिक प्रशासन अपघातस्थळी सर्वतोपरी मदत करत असून वरिष्ठ अधिकारी व आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. 
राहुल यांनी व्यक्त केला शोक 
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या अपघाताबद्दल ट्विटरच्या माध्यमातून तीव्र शोक व्यक्त केला असून स्थानिक अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. 
> पोलादपूर येथील दुर्घटनेसंबंधी माहिती व मदतीसाठी संपर्क क्रमांक 
चंद्रसेन पवार, महाड तहसीलदार (८४५४९९७७४०), प्रदीप, कुडाळ (९४२२०३२२४४), प्रदीप लोकरेः नायब तहसीलदार, रोहा (९४२३०९०३०१), भाबडः नायब तहसीलदार, माणगाव (९४२२३८२०८१)
मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ४ लाखांची मदत जाहीर 
मृतदेह बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल 
> पोलादपूर दुर्घटना: रात्र झाल्याने शोधकार्य थांबवले; १७ मृतदेह बाहेर काढण्यात यश
For more information.google.facebook 


Friday, July 27, 2018

आजची बातमी
*पालकमंत्री आणि आमदार कोमात आणि सरकारी अधिकारी जोमात"*www.shivsahyadrinews.blogspot.com
 ता-संगमेश्वर(अमोल गायकर):संगमेश्वर तालुक्यामधील साडवली गाव ते देवरुख शहरापर्यंत चा मुख्य मार्ग खड्डेमय तसेच अविकसित कामामुळे मुळे मार्ग जलमय झाला आहे. वेळोवेळी प्रशासनाला स्थानिकांनी भेट देऊन सुद्धा अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत." पालकमंत्री आणि आमदार कोमात आणि सरकारी अधिकारी जोमात" अशी परिस्थिती असल्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सदर मार्ग पूर्णपणे जलमय झाल्यामुळे मार्गावरील निर्माण झालेले खड्डे वाहन चालकांना दिसत नाहीत या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात घडण्याची शक्यता असून या गोष्टीला जबाबदार पूर्णपणे प्रशासनाचे संबंधित अधिकारी आणि स्थानिक लोकसेवक असतील स्थानिकांनी म्हटले आहे.


For More information .google.facebook

प्रस्तावना
प्रिय वाचकहो,
सस्नेह वंदे!

मी भाई अमोल गायकर, आपणा सर्वांसाठी एक असे व्यासपीठ घेऊन आलो आहे की, ज्या मार्फत आपणांस नेहमी घरबसल्या समाजातील चांगल्या-वाईट घटनांची माहिती, ताज्या घडामोडी अर्थातच बातम्यांचा आढावा, तुम्ही आमच्या पत्त्यावर पाठवलेल्या सामाजिक समस्यांचा प्रसार, त्याच प्रमाणे सामाजिक लेख, कविता, विनोद(जोक्स),विविध कंपनीच्या उत्पादन वस्तूच्या(प्रोडक्ट) संदर्भात माहिती व विक्री, आपल्या कंपनी अथवा संस्थेची जाहिरात(अटी व शुल्क लागू) सामाजिक कार्यकर्ता किंवा सामाजिक संस्था यांच्या कार्याचा प्रसार, शासनाच्या योजनांची माहिती,आपला हक्क मिळविण्यासाठीचे अनेक मार्ग,महाराष्ट्रातील संत-महात्मे,थोर समाजसुधारक यांची माहिती  राजकारणी नेत्यांची माहिती,व्हायरल झालेल्या घटनांची सत्य परिस्थिती, गुन्हेगारी वृत्ताच्या खऱ्या कथा, आपल्या वाचकांच्या वाढदिवसाची जाहिरात   या साठी मी आपणां सर्वांसाठी खुले व्यासपीठ तय्यार केले आहे. आपल्या बोली मराठी भाषेप्रमाणे लेखी मराठी काव्यांचा वापर आणि प्रसार होणे ही काळाची गरज आहे.आपणांस माझ्या या ब्लॉगवरील काही आवडले तर जरूर त्याचा प्रसार (Share)करा.
धन्यवाद!
आपला नम्र
भाई अमोल गायकर
मोबा-8898545070
www.savdhanbharatsahyadri.blogspot.com

for more infiGoogle  . facebook 

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...