Saturday, March 28, 2020

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.


(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर)

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.



     लोकप्रतिनिधी म्हटले की, डोळ्यासमोर दिसून येतो तो चेहरा जो लोकांनी निवडणुकीत जिंकून दिलेला असतो. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांना जिंकून देतात जेणेकरून विकासाचे काम आपल्या भागात होईल तसेच जनता ज्यावेळी संकटात असेल तेव्हा धावून येईल. आणि हेच या लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे.
आपल्याला माहितच आहेत की, पूर्ण जगभरासाहित भारत देशात सुद्धा " कोरोना" नावाच्या विषाणू जन्य व्हायरस ने थैमान गाजवले आहे. महाराष्ट्र राज्यात सुध्दा अंदाजे 170च्या वर कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.आपल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा या कोरोनाने थैमान गाजविले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे आता जनता संकटात आहे आणि मूलभूत गरजांचा प्रश्नसुद्धा आ करून उभा राहिला आहे. या संकटात खरे म्हणजे लोकप्रतिनिधी जनतेसाठी धावून आले पाहिजे पण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे विद्यमान खासदार श्री. विनायक राऊत हे तर मुंबई मध्ये बसून हार्मोनियम वाजवित असल्याचे "अविस्मरणीय क्षण " म्हणत ट्विट केले त्यामुळे कोकणी जनतेने सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले आहे. " कोरोनामुळे जनता त्रस्त आणि विद्यमान खासदार मस्त " असे वातावरण दिसून येत आहे.
विरोध कोणत्या पक्षाला नाही पण निवडणुकीत जनतेला कुटुंब मानणारे,जिंकूनसुद्धा जनतेकडे पाठ फिरवितात अशा लोकप्रतिनिधिंना आहे,आणि वाचकहो तुमचाही विरोध असला पाहिजे.जो लोकप्रतिनिधी जनता संकटात असताना, अत्यावश्यक सेवा मधील पोलिस प्रशासन, बँक कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, स्वच्छता कर्मचारी आणि इत्यादी अत्यावश्यक सेवामधील व्यक्ती हे अहोरात्र जनतेची सेवा करीत आहेत आणि हे लोकप्रतिनिधी निवडून येतात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून आणि हे बसलेत मुंबईला,तिथे हार्मोनियम स्वतःच्या घरी वाजवित बसलेत आणि "अविस्मरणीय क्षण" म्हणून हे ट्विट करीत आहेत म्हणजे जनता आधीच त्रस्त आहे आणि हे मस्त आहेत असेच बोलायला हरकत नाही.नागरिकांचे मुलभूत प्रश्‍न सोडविणे स्थानिक लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे आणि आता तर भारत देश लॉकडाऊन आहे.त्यामुळे घराबाहेर पडणे हा तर आरोग्याचा नाहीतर देशाच्या विरोधात आहे अशी समज प्रत्येकाने घेतली पाहिजे.विनाकारण गर्दी वाढवणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण आहे तसेच पोलिस प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील लोकांची देवदूतासारखी स्वतः संकटात उभे राहून, स्वतःच्या कुटुंबाला सोडून आज दिवसरात्र जनतेचे सेवा चाललीय हे पहा काही तर तुटपुंज्या पगारात राहणारे सरकारी कर्मचारी स्वतःचे कर्तव्य बजविण्यासाठी स्वतःचा परिवार विसरून जनतेची सेवा करण्यात मग्न आहेत. का हेही माणसेच ना त्यांना स्वतःची कर्तव्ये आणि जबाबदारी माहितीय आणि या लोकप्रतिनिधी ना स्वतः ची कर्तव्ये आणि जबाबदारी माहिती नाही का? मुंबईत बसून शाळेला भेट दिलेली पेटी (हार्मोनियम) स्वतःच्या घरी बसून वाजवित व्हिडीओ शेअर केल्याचा,यामध्ये एक मात्र नक्की हार्मोनियम कुठले आहे आणि ते तुमच्या घरी आहे हे मात्र जनतेला नेटकऱ्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे विद्यमान खासदार यांना सोशलमीडिया वर ट्रोल करित दाखवून दिले.... श्री.विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे विद्यमान खासदार म्हणून देशाच्या सर्वोच्च संसदेतील लोकप्रतिनिधी आहेत पण यांनी मात्र मतदारसंघाकडे पूर्णपणे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे.याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा सध्या रत्नागिरी जिल्ह्यात न दिसता सोशल मीडिया वर दिसत आहेत.त्याचबरोबर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकत्र येऊन या कोरोनाविरुद्ध निर्णय घेत असताना खासदार संजय राऊत हेसुद्धा या संकटात जनतेच्या भावनांशी खेळणारे धर्मांध राजकारण करीत असल्याचे दिसून येत आहे. तळागाळातील जनता आज कोणत्या परिस्थिती आहे देशात,राज्यात काय चालले आहे याचेही भान यांना नाही असे दिसून येत आहे. आज जनता आज संकटात आहे या कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे . आज बाजारपेठा किंवा अन्य मूलभूत स्त्रोतांचे माध्यम सुरळीत चालू नाही. काजू,आंबा बागायतदार पूर्णपणे तणावाखाली जगत आहेत. कोकणात भात शेती, मजुरी ,मासेमारी तर बहुतेक जनवर्गाचे "हातावरचे पोट" असून आजची परिस्थिती पाहता खूपच हलाखीचे दिवस आहेत. शिंमग्याला आलेले काही चाकरमानी इथे तर त्यांच्या घरची मुले ,इतर व्यक्ती मुंबईत त्यामुळे चाकरमानी वर्ग पूर्णपणे तणावाखाली जगत आहे.निवडणूकिसाठी मोठी मोठी आश्वासने देऊन निवडून आलेले लोकप्रतिनिधी आता नक्की कुठे हरवले आहेत हाही एक प्रश्न निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधी ज्यावेळी जनता संकटात असताना कर्तव्य आणि जबाबदारी विसरतात तेव्हा त्या लोकप्रतिनिधी पेक्षा स्वतःला दोष देणे हेच योग्य ठरेल असेही उत्तर सर्वसामान्य यांना मिळाले आहे.
या लोकप्रतिनिधी अगोदर जनतेसाठी धावणारी पोलिस दल आणि आरोग्य यंत्रणा तसेच इतर अत्यावश्यक सेवेमधील व्यक्ती हेच खरे कर्तव्य आणि जबाबदारी बजावत आहेत, हे चित्र स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीत मी वाचकांना अशी विनंती करतो की, कृपया पंतप्रधान, मुख्यमंत्री,पोलिस प्रशासन,आरोग्य यंत्रणा, स्वच्छता विभाग आणि संबधित सर्व अत्यावश्यक सेवा यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा,घरी रहा आणि कोरोना टाळा. आपल्या देशातुन हे कोरोनाचे संकट घालवायचे असल्यास शासन-प्रशासन यांच्या सूचनांचे पालन करणे काळाची गरज आहे. आज " अविस्मरणीय क्षण" या कोरोनाचे आपल्या कुटुंबाला मिळत आहेत पण नक्कीच आपण घरी राहून खबरदारी घेतलीत तर हे संकट टळणार आहे. आता आपणच आपले रक्षक आणि या देशाचे सुद्धा कारण पोलिस प्रशासन,आरोग्य यंत्रणा आणि इतर अत्यावश्यक सेवा आपल्यासाठी स्वतःचे कुटुंब सोडून जनसेवा करित आहेत त्यांना सहकार्य करणे काळाची गरज आहे.

चीनचा कोरोना आला जनतेच्या गर्दीमध्ये ¶
देव धावला जनतेचा रक्षक खाकी वर्दीमध्ये ¶¶
पाठ फिरवतात लोकप्रतिनिधी ,कुटुंबाला विसरले ¶
चुकी कोणाची,भोगतेय कोण का विपरीत घडले ¶¶

(सदर लेख हा जनहितार्थ असून वास्तविक आहे, हा कोणा पक्ष या व्यक्तीच्या विरोधात नसून हा वृत्तीच्या विरोधात आहे. आज असलेली हि भयाण परिस्थिती आणि यामध्ये आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी आपल्याकडे पाठ फिरविणे म्हणजे हा लोकशाहीचा विश्वासघात आहे.भारतिय राज्यघटना,मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र कलम १९ अनुसार प्रत्येकास मतस्वातंत्र्य  आहे त्याप्रमाणे जनतेसाठी हे मत या लेखामध्ये " संगमेश्वर टाईम्स" या ब्लॉगद्वारे मांडले आहे ,लेख कोणा आवडो न आवडो परंतु सदर लेख हा जनहितार्थ असून वास्तविक परिस्थिती दाखवितो)

जय भारत || जय हिंद || 

लेखक -  ✍️ अमोल (भंडारा) गायकर
( www.sbsahyadri.blogspot.com)
खालिल फोटो हे ट्विटर आणि इतर सोशल मिडियावरून प्राप्त झाले



No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...