नालासोपार्यातून ८ देशी बॉम्बसह स्फोटके जप्त, आरोपी सनातनचा साधक?
मुंबई 10/08/2018 (सा.पु.प्र)नालासोपारा भांडार आळीत राहणाऱ्या सनातन संस्थेचे कार्यकर्ते वैभव राऊत यांच्या घरी गुरवारी रात्री ATS ने धाड टाकून मोठ्या प्रमाणात स्पोटके जप्त केली आहेत.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव राऊत यांच्या घरातून ८ देशी बॉम्ब मिळाले आणि त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका दुकानात बॉम्ब बनवण्याची सामग्री मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली आहे. सांगण्यात येत आहे की ही सामग्री गन पावडर, सल्फर आणि डिटोनेटर असून, त्यांच्यापासून दोन डझनहून अधिक बॉम्ब बनविण्यात येऊ शकतील.
वैभव राऊत यांनी ही विस्फोटके का आणि कशी जमा केली? विशेष म्हणजे ही सामग्री सापडल्याने या घटनेची तीव्रता अधिक वाढली आहे. वैभव हा सनातनी विचारधारेचा असून कुठे घातपात करण्याचा डाव होता का? याबाबत अजून कोणतीही माहिती मिळाली नाही.
एटीएसची टीम गेल्या काही दिवसांपासून सतत पाळत ठेऊन होते आणि शेवटी गुरूवारी रात्री राऊत याच्या घरी धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याची घरीच कसून तपासणी सुरू आहे. श्वान पथक फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी उपस्थित आहे. याबाबत अधिकृत माहीती एटीस अधिकारी देत नाहीत.
No comments:
Post a Comment