Monday, May 18, 2020

रत्नागिरी पोलिसांनी केली ट्विटर भविष्यवाणी (वाचा संगमेश्वर टाईम्स चेसंपुर्ण बातमीपत्र)

रत्नागिरी पोलिसांनी ट्विट वर केली सादर बारा राशींचे भविष्यवाणी(संगमेश्वर टाईम्स)
रत्नागिरी(अमोल गायकर)- देशभरासहित महाराष्ट्र राज्यात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त झाला असताना परजिल्ह्यातून येणाऱ्या कोकणातील नागरिकामधील कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले. यामुळे दिवस रात्र सेवा देणारे आरोग्य यंत्रणा, पोलिस प्रशासन यावरील ताण मात्र वाढला. काही ठिकाणी हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन सर्वसामान्य पाळताना दिसतात पण काही ठिकाणी तर काही नागरिक लपून छपून तर काही खुलेआम भ्रमण करताना दिसत आहेत.
     रत्नागिरी पोलिसांनी यावर बारा राशींचे भविष्य खालिल प्रमाणे ट्विटर ट्विट केले.निदान यावरून तरी विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांना शिकवण भेटेल.थोडक्यात काय याला भविष्य वाणी न म्हणता नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि वेळेचे भान ठेवण्याचे आवाहन म्हणता येईल.
   👇👇👇👇

➡️ सर्व बारा राशींचे भविष्य:
अनावश्यक प्रवास टाळावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. मास्क व Sanitizer वापरून शरीराला होणारी हानी कमी करावी. शासनाने ठरवून दिलेले नियम व अटींना सन्मान देऊन कोर्टकचेरीच्या फेर्‍या टाळता येतील. वेळेचे महत्व लक्षात घ्या,घरी राहा सुरक्षित राहा.
रत्नागिरी पोलिस आणि आरोग्य यंत्रणा हे अहोरात्र जनतेच्या सेवेत आहे आम्ही संगमेश्वर टाईम्स संपादकीय मंडळ तर्फे त्यांचे आभार मानतो तसेच तुमच्यामुळे आम्ही मानवी दहशतवादी आणि जैविक दहशतवादी हल्यात सुरक्षित आहोत याबाबद्दल आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.
संगमेश्वर टाईम्स


No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...