Tuesday, July 30, 2019

दर पाच वर्षांनी निवडणुका जवळ आल्या कि,यात्रा भरते त्याची हि कहाणी

दर पाच वर्षांनी निवडणुका जवळ आल्या कि,यात्रा भरते त्याची हि कहाणी 
दर पाच वर्षांनी निवडणुका जवळ आल्या कि,यात्रा भरते त्याची हि कहाणी
(बिचारा भोळा – भाबड्या कार्यकर्त्याचे प्रश्न ,समर्थकाचा मोठेपणा ,दारुड्याची शुद्ध आणि त्यावरील उत्तरे ....)
कार्यकर्ता -या यात्रेत खेळणी भेटत्यात व्हय?
भंडारा - हो भेटतात ना हातात झेंडा घेऊन असतात जे तुटक्या पैशापायी, एक बाटली दारू साठी आणि बिर्याणी साठी येतात ना तीच खेळणी हो. लय भारी पण ही खेळणी मनोरंजन त्यांचे करतात , जाळपोळ आणि दंगल करून जेल मध्ये जातात, त्यांच्या एका हाकेवर रस्त्यावर उतरतात आणि आयुष्य बरबाद करून घेतात. 
(हे  ऐकून एक कट्टर समर्थक येतो आणि मध्येच बोलतो )
समर्थक -कायपण राव 2 तासासाठी एवढे कोण देतंय व्हय..मिळतंय तर घ्यायचे.मागच्या वेळी ८ दिवसांत २००० रुपये कमवून मस्त खाणे-पिणे होत.
भंडारा – अजून काय काय भेटतय ?लय भारी बुवा
समर्थक मागच्या वेळी साहेबांनी  आवाज दिला तिकडून आणि इकडे सर्व तोडफोड केली,आमच्यापैकी एक आता तर नगरसेवक हाय.काय ओळख एकदम भारी.साहेब नावाने ओळखतात मला बी.
भंडारा - भारी बुवा,तोडफोडी नंतर जेल झाली असेल सर्वांना ...
समर्थक - आठ दिवस  होतो आतमध्ये ....पण आम्हीच होतो ह्यो आताचा नगरसेवक नव्हता आत.
(तेवढ्यात एक बेवडा येवून मध्येच बोलतो )
दारुडा – ये ह्यो नगरसेवक तर आमच्या जीवावर झालाय ....म्हणून तर दारू पितोय मजा करा रे..
समर्थक – ये शहाण्या निघ नाहीतर अजून मार भेटल (दारुड्याच्या कानशिलात लगावून आणि दारुडा गेला)
समर्थक - आमच्या साहेबाला बोलतोय साला बेवडा कुठला ...पहिला चांगला होता चांगला शिकलाय पण , म्हणून दारू पितोय  हाहाहा ....
भंडारा – मस्त केलेत हो तो दारू पियालाय पण शुद्धीत बोलला आणि तुम्ही दारू न पिता शुद्धीत नाहीत.
समर्थक -हे सायबा जास्त बोलतोस काय केल मी ? साहेबाला बोलले आम्हाला खपणार नाही.
भंडारा - तुमच्या ह्याच विचाराने तुटलोय आम्ही, बिघडली आहेत भविष्य आमची  आणि नेत्यांची भाष्य सुद्धा,,आता तरी डोळे उघडणार का? लोकांमधून कार्यकर्ता निर्माण होतो,कार्यकर्त्यामुळे पक्ष बनतो,पक्षामुळे पक्षप्रमुख, आणि तुमच्या आमच्या मतदानामुळे हे नेते बनतात.हे आपले सेवक आहेत आणि आपण त्यांना साहेब ,भाई म्हणून त्यांच्या मागेमागे फिरतो.त्यांच्यासाठी आपण एकमेकांना मारतो.आवाज त्यांचा आणि जेल तुम्हाला.अरे जनतेसाठी रस्यांवर उतरणारा नेता पाहिजे नुसता आवाज दिला कि न्याय भेटत नाही.ते भडकवतात आणि आपण भडकतो .काय म्हणे तर साहेब बोलले.अरे तुमच्यामुळे तर साहेब निर्माण झाले. आपण भावनिक होतो आणि नको ते घडवतो . तुमच्यासारखे समर्थक तर या नेत्यांना राजा,साहेब आणि त्यांच्या  पत्नींना आईसाहेब ,मुलग्याला युवराज अशी संबोधतात .अक्कल गहाण ठेवलीय तुम्ही. जेव्हा या सह्याद्रीलाही आभाळाशी भिडताना पाहतो तेव्हा आठवते ते  सह्याद्रीच्या पायथ्याशी बलिदान झालेले रक्त, अरे पाण्यात सुद्धा इथली माती टाकली तरी त्या पाण्यावरचा तवंग सुद्धा आठवण करून देईल कोण राजा आणि युवराज.ज्यांच्या मुळे हि माती लाभली तीही आठवण करून देईल त्यांचा पराक्रम ,या सह्याद्रीच्या कडेकपारीतून ,किल्यांवर अजून गुंजतो तो एकच आवाज.विसरलात कसे इथे फक्त राजा म्हणून माझे शिवरायच,आईसाहेब म्हणून  माता जिजाई आणि युवराज माझे संभाजी राजे,आणि हो  साहेब तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर. आठवा त्यांची कार्य ,त्यांचा पराक्रम आणि बलिदानही .त्यांच्याच नावावरती करतात राजकारण,वेळ पडली तर दंगली हि.माझ्या महापुरुषांच्या उपमा  या  आताच्या नेत्यांना देता हि फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.इकडे अत्याचारा वर तर फक्त निषेध नोंदवला जातो माझ्या राजांच्या काळात तर  चौरंग केला जायचा.स्वराज्याशी गद्धारी केली म्हणजे आजचा भ्रष्टाचार,आणि भरपूर काही तर त्याचा  अनाजीपंत केला जायचा.साडेतीनशेहून जास्त वर्ष झाली तरी त्यांच्या इतिहासाला गालबोट लागले नव्हते आणि तशी हिमंत हि नव्हती . पण आतातर तुमच्या मुळे हे त्यांच्या नावावर राजकारण सुरु झाले तरी तुम्ही हातात वेगवेगळे झेंडे घेवून फिरा या भ्रष्ट नेत्यांच्या पाठीमागे.ज्यांनी तुम्हाला मोघलांपासून वाचवले ज्यांनी तुम्हांला गुलामगिरीतून बाहेर काढले ते याच साठी का ? तुम्ही परत त्याच गुलामगिरीत गेलात आता फक्त राज्यकर्ते बदललेत . अभ्यास शिकविला गेला कि , राजांनी गड जिंकले पण ते गड-किल्ले म्हणजे तुमची आमची आताची ठिकाणे हेही विसरता.कसे विसरू शकता युवराजांचे बलिदान आणि हे भ्रष्ट नेते त्यांच्याच नावावर राजकारण करतात ...... मघाशी त्या दारूडा आला तो खरे बोलला ,पण तुमची शुद्ध गेलीय,शिकून नोकऱ्यांच नाहीत फक्त बेरोजगारी ,निवडणूक आली कि मेघाभरती पण कसली पक्षात घेण्याची हेही तुम्हाला समजले नाही .नेता म्हटला कि जनतेसाठी रस्त्यावर उतरणारा पाहिजे फक्त आवाज आणि आदेश देवून काय फायदा.जास्त काही बोलत नाही पण एक चारोळी सांगतो त्यावर नक्कीच अभ्यास करावा.
सत्तेसाठी तळवे चाटतीलहि हे परकीयांचे,
संसार उध्वस्त करतात हे स्वकीयांचे
कार्यकर्त्यांच्या मुळे  जीवन यांचे नेत्यांचे
गुलाम तुम्ही ,मरण मात्र आमचे.....
कार्यकर्ता बनायचे असल्यास प्रामणिक नेत्यासोबत जनहितार्थ  रहा.गुलामगिरीत कशाला राहता.अरे जगायचे तर वाघासारखे असे म्हणता आणि शेळी होवून जगता.षंड होण्यापेक्षा गुंड झालात तरी चालेल ,चुकीचे घडतेय तर जनहितार्थ बंड करावाच लागतो.अन्याय होतांना दिसतो २ दिवस सोशल मिडिया मार्फत निषेध आणि बलिदानावर श्रद्धांजली नोंदवायची आणि शांत बसायचे . काय झालेय सर्वांना?  तुमचे रक्त आटलय ,रक्त सुकलेय  कि मेलय ह्याचा काय सुगावा लागत नाही.पण एक मात्र नक्की रक्त माणुसकीच्या नावाचे  या राजकारणात बाटलेय.अन्याय,भ्रष्टाचार दिसतोय तरी शांत ,ज्यांना निवडून देता त्यांच्या जबाबदारी आणि कर्तव्याची जाणिव सुद्धा करत जा ,तुमचा हक्क इथे मागून मिळत नाही तो मिळवायला लागतो इथे मागून मिळते ती फक्त भीक दर पाच वर्षांनी ह्याला गुलामगिरीच म्हणावी लागेल .मनुष्य जन्मी गुलामगिरीत तर आताची जनावरे सुद्धा राहत नाही.कधी कधी वाटते त्या नेत्यांसोबत तुमच्यासारख्याना सुद्धा कडेलोट करावा.हे बघा विचार माझे पण कृती मात्र तुमची असेल.
कार्यकर्ता  आणि समर्थक -  सायबा डोळे उघडले आमचे आम्ही यापुढे असेच होईल निडर जगणार.आणि जनहितार्थ कामे करून ह्यांना धडा शिकविणार
भंडारा - अजून एक सांगतो आणि निघतो मी
आजपर्यंत गुलामगिरीत जगलात
लोकशाहीचा घात हि तुम्हीच केलात
लेखणी घ्या तुमच्या विचारात
अन्यथा पडाल एक दिवस धूळखात .............

लेखक- भंडारा (अमोल गायकर )(सर्व हक्क सुरक्षित)
मोबा-८८९८५४५०७०

माझ्या प्रिय वाचकहो आवडला तर नक्की शेअर करा 

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...