Thursday, May 30, 2019

‘मोदी सरकार-२’ : एका क्लिकवर मंत्र्यांची यादी


(या पोस्टवरील फोटो चा आणि माझ्या साईटचा काही संबंध नाही. फक्त उदाहरणाकरिता सदर फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. या फोटो च्या फोटोग्राफरचे खूप धन्यवाद)
राष्ट्रपती भवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यांमध्ये नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी एकूण ५७ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये २४ केंद्रीय मंत्री, ९ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदींसह सर्व मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, रामविलास पासवान, रवीशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, अरविंद सावंत यांच्यासह २४ केंद्रीय मंत्र्यांनी शपथ घेतली. जाणून घेऊयात नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात कोणाची वर्णी लागली आहे.
नरेंद्र मोदी (पंतप्रधान)
केंद्रीय मंत्री मंडळ (२४) –
– राजनाथ सिंह (उत्तर प्रदेश)
– अमित शाह (गुजरात)
नितीन गडकरी (महाराष्ट्र)
– सदानंद गौडा (कर्नाटक)
– निर्मला सीतारमण (गुजरात)
– राम विलास पासवान (बिहार)
– नरेंद्र सिंग तोमर (मध्य प्रदेश)
– रवि शंकर प्रसाद (बिहार)
– हरसिमरत कौर बादल (पंजाब)
– डॉ. थावरचंद गहलोत (मध्य प्रदेश)
– एस. जयशंकर (बिहार)
– रमेश पोखरियाल निशांक (उत्तराखंड)
– अर्जुन मुंडा (झारखंड)
– स्मृती इराणी (उत्तर प्रदेश)
– डॉ. हर्षवर्धन (दिल्ली)
प्रकाश जावडेकर(महाराष्ट्र)
– पियुष गोयल (महाराष्ट्र)
– धर्मेद्र प्रधान (ओडिसा )
– मुख्तार अब्बास नक्वी (उत्तर प्रदेश)
– प्रल्हाद जोशी (कर्नाटक)
– डॉ. महेंद्रनाथ पांडेय (उत्तर प्रदेश)
डॉ. अरविंद सावंत (महाराष्ट्र)
– गिरिराज सिंह (बिहार)
– गजेंद्रसिंह शेखावत (राजस्थान)
राज्यमंत्री (स्वतंत्र्य कारभार) खालील प्रमाणे (९) –
संतोषकुमार गंगवार (उत्तर प्रदेश)
– राव इंद्रजित सिंह (हरियाणा)
– श्रीपाद नाईक ( गोवा)
– डॉ. जितेंद्र सिंह (जम्मू-काश्मीर)
– किरण रिजीजू (अरुणाचल प्रदेश)
– प्रल्हाद पटेल (मध्य प्रदेश)
– आर. के. सिंह (बिहार)
– हरदीपसिंग पुरी (पंजाब)
– मनसुख मांडवीय (गुजरात)
राज्यमंत्री (२४) –
– फग्गनसिंग कुलस्ते (मध्य प्रदेश)
– अश्विनीकुमार चौबे (बिहार)
– अर्जुनराम मेघवाल (राजस्थान)
– व्ही के सिंह (उत्तर प्रदेश)
– कृष्णपाल गुर्जर (हरियाणा)
रावसाहेब दानवे (महाराष्ट्र)
– डी किशन रेड्डी (तेलंगणा)
– पुरुषोत्तम रूपाला (गुजरात)
रामदास आठवले (महाराष्ट्र)
– साध्वी निरंजन ज्योती (उत्तर प्रदेश)
– बाबूल सुप्रिओ (पश्चिम बंगाल)
– संजीव बालियाना (उत्तर प्रदेश)
– संजय धोत्रे (महाराष्ट्र)
– अनुराग ठाकूर (हिमाच प्रदेश)
– सुरेश अंगडी (कर्नाटक)
– नित्यानंद राय (बिहार)
– रतनलाल कटारिया (हरियाणा)
– व्ही मुरलीधरन (केरळ)
– रेणुका सिंह (छत्तीसगढ)
– सोमप्रकाश (पंजाब)
– रामेश्वर तेली (आसाम)
– प्रतापचंद्र सारंगी (ओदिशा)
– कैलाश चौधरी (राजस्थान)
– देबश्री चौधरी (पश्चिम बंगाल)

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये विलीन होणार का? तुमचे मत सांगा.या साईट वर कॉमेंट करा.

ब्रेकिंग न्यूज/Breaking news
राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरदजी पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुलजी गांधी दिल्लीत झाली भेट.
तब्बल 25 ते 30 मिनिटे झाली चर्चा.
येत्या विधानसभा बद्दल झाली चर्चा.
पवारांच्या भेटीनंतर राहुल भेटणार डॉ. मनमोहन सिंग यांना भेटणार.
काँग्रेस कडे 52 खासदार तर राष्ट्रवादी कडे 5 खासदार
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या इतपतही काँग्रेसला जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन केल्यास विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा होऊ शकतील.

पशुपक्षांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत - मारुती चितमपल्ली

पशुपक्षांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत*
 - मारुती चितमपल्ली

*1. चातक पक्षी -*

पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले हे हमखास समजावे.

*2. पावशा पक्षी -*

चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत! ‘पेर्ते व्हा’ असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत.

*3. तित्तीर पक्षी -*

माळरानावर, शेतांवर काळ्या-पांढऱ्या, अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोडय़ान केको.. कोडय़ान केको..’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की आता लवकरच पाऊस येणार असे खुशाल समजावे. जंगलातील माळरानांत या पक्ष्यांचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही. परंतु मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की ते हमखास पावसाचे लक्षण समजले जाते.

*4. कावळा -*

कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो, हा जंगलातला अनुभव आहे. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणपर्वाची ती नांदी होय. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही. आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात.

यापेक्षाही मनोरंजक बाब म्हणजे कावळिणीने अंडी किती घातली, यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस. एकच अंडे दिले तर अतिशय कमी. आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले.

*5. वादळी पक्षी -*

पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. अशावेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले की वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते. त्याचा अर्थ हमखास पाऊस पडणार किंवा सुमद्रात वादळ येणार.

*6. मासे -*

पहाडी, डोंगरी भागातील माशांच्या अंडय़ांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा… उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार, याची सुस्पष्ट चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.

*7. खेकडे  -*

तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात. तुम्ही त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता अशा अनेक अभूतपूर्व घटना पाहावयास मिळतात. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकडय़ांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात. हा खेकडय़ांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे. भरधाव वाहनांखाली असे हजारो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासादरम्यान चिरडले जातात. परंतु त्यांची समुद्री धाव कशासाठी असते, याचा कोणी विचारही करीत नाही.

*8. हरीण -*

पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही हरिणी पिल्लांना जन्म देत नाहीत.

*9. वाघिण -*

आम्ही पाहिलेली ही वाघीण गर्भवती होती. तिला पिल्ले होणार होती. परंतु या वाघिणीने डायसकोरियाचे कंद खाऊन गर्भपात करवून घेतला. हे कंद खाऊन आदिवासी स्त्रियादेखील गर्भपात करवून घेतात. या वाघिणीचे सृष्टीज्ञान अक्षरश: तोंडात बोटे घालायला लावणारे होते. यंदा पाऊस येणार नाही, त्यामुळे जंगलात गवत राहणार नाही. गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणीदेखील राहणार नाहीत. परिणामी आपल्या पिलांना भक्ष्य मिळणार नाही. त्यांची उपासमार होईल… याची पूर्वकल्पना आल्यानेच तिने गर्भपात करवून घेतला होता. वाघिणीच्या गर्भपातानंतर त्या वर्षी अभूतपूर्व दुष्काळ पडल्याचा अनुभव आम्ही घेतला आहे.

*10. वाळवी -*

जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवी/ उधईला कधी पंख फुटत नाहीत. परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाटय़ात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात. त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढय़ा तयार होतात. त्या जंगलात वारुळे तयार करतात.

*11. काळ्या मुंग्यां -*

हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार, हे समजावे. अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत.

बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले की ती हमखास पावसाची चाहूल समजावी. या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते. त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वीच स्वत:च्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात. पावसाळ्यापूर्वी सापदेखील मोठय़ा प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात.

*मराठवाडय़ात प्रचंड संख्येने आढळणाऱ्या गोडंबा- म्हणजे बिब्याच्या झाडाला बहर येणे हे दुष्काळाचे संकेत आहेत.*

 *खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्या वर्षी पाऊस कमी पडतो.*

*कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवाऱ्याचे संकेत देतो.*

*बिचुलचा बहर आणि कुटजाचा बहर तर अतिवृष्टीचेच हाकारे देतो.*

आपण वेली पाहतो. या वेलींचे तंतू अगदी काटकोनात, सरळ रेषेत उभे राहताना दिसू लागले तर ते चांगल्या पावसाचे लक्षण समजावे.
(सदर माहिती ही social media वरून प्राप्त झाली असून वाचकांसाठी उपयुक्त म्हणून प्रसिद्ध केली आहे.)

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...