Monday, September 30, 2019

A आणि B फॉर्म म्हणजे 'एबी' फॉर्म म्हणजे काय रे भाऊ, जाणून घ्या

*संगमेश्वर टाईम्स*
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
*A आणि B फॉर्म म्हणजे 'एबी' फॉर्म म्हणजे काय रे भाऊ, जाणून घ्या*

मुंबई : – विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशात सर्वच पक्ष निवडणुकांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करत आहेत. यादीत नावे जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ दिले जात आहेत. आता हे ‘एबी फॉर्म’ म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असेल. याठिकाणी आम्ही तुम्हाला ‘एबी फॉर्म’ म्हणजे काय आणि त्याची गरज का ? इत्यादी माहिती देत आहोत.
‘एबी फॉर्म’ म्हणजे काय ?
‘एबी फॉर्म’ दिला गेलेला संबंधित उमेदवार हा तिकीट देणाऱ्या पक्षाचा अधिकृत उमदेवार समजला जातो आणि त्याला संबंधित पक्षाचं अधिकृत चिन्हंही दिलं जातं. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत याच ‘एबी फॉर्म’ ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखाद्या पक्षाची उमेदवारी आणि चिन्ह मिळण्यासाठी ‘एबी फॉर्म’ हा महत्त्वाचा आणि अनिवार्य दस्तावेज असून त्यामुळे उमेदवाराला पक्षाची अधिकृत मान्यता मिळाल्याचे जाहीर होत असते.
– ए फॉर्म’ वर पक्षाने तिकीट वाटपासाठी नेमलेल्या अधिकृत व्यक्तीची स्वाक्षरी असते. ज्याद्वारे उमेदवाराला मान्यता मिळते.

– ‘बी फॉर्म’ हा ऐन प्रसंगी समस्या निर्माण झाल्यास बॅकअप प्लॅन चा भाग असतो. पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाने सूचवलेल्या आणखी एका उमेदवाराचं नावं असतं. काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर निवडणूक आयोग या दुसऱ्या मान्यताप्राप्त उमेदवाराला अधिकृत म्हणून मान्यता देतो.
उमदेवारीच्या वेळी एखाद्या पक्षाकडून तिकीट घेऊन निवणुकीचा फॉर्म भरणाऱ्या उमेदवाराला ‘एबी फॉर्म’ द्यावाच लागतो. तो ‘एबी फॉर्म’ सादर करु शकला नाही तर त्याचा दावा न्यायालयतही ग्राह्य धरला जात नाही. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना सर्वच गोष्टी आणि कागदपत्रे अगदी काटेकोरपणे तपासले जातात. त्यात ‘एबी फॉर्म’ हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो.
या ‘एबी फॉर्म’ मध्ये उमेदवाराचं नाव, पक्षातील पद आणि कोणत्या मतदारसंघातून पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, याची माहिती द्यावी लागते. निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज भरताना काहीवेळा अधिकृत उमेदवाराने अर्ज भरल्यानंतरही छाननीच्या वेळी त्यात काही त्रुटी निघाल्या, तर अर्ज बाद ठरु शकतो. अशा वेळी पक्षाचा कुणीतरी पर्यायी उमेदवार असावा यासाठी राजकीय पक्षांकडून ‘बी’ फॉर्म दिला जातो.
*संगमेश्वर टाईम्स*

Saturday, September 28, 2019

संगमेश्वरमधील जिवंत मुडद्याची हि कहाणी.....



संगमेश्वरमधील जिवंत मुडद्याची हि कहाणी.....

संगमेश्वर टाईम्स (लढा अस्तित्वासाठी,आवाज लोकशाहीचा,हा वारसा निर्भीड पत्रकारितेचा )
(सदर लेख हा संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून लेखक अमोल गायकर लिखित आहे)

संगमेश्वर टाईम्स चे खास संपादकीय
*शब्द मशाल*

          कोकणातील संगमेश्वर तालुका म्हटला कि,देवभूमी,स्मारक पुरातन मंदिरे आणि शिवकालिन वास्तु यांनी नटलेला एक स्वर्गच म्हणता येईल,पण या स्वर्गाला गालबोट लावण्याचे दुष्कर्म या नेत्यांनी केले आहे.संगमेश्वर मध्ये निसर्गजडित रत्नपाचूनी,हिरेजडित अशा नैसर्गिक अलंकारिक दृष्टीने समृद्ध असा तालुका म्हणून बघितले जाते.शेती पासून मोठ्या उद्योग धंद्यांसाठी सक्षम असा तालुका.संगमेश्वर तालुक्याच्या सुरुवातीपासून शेवटच्या हद्दीपर्यंत पर्यटनास उपलब्द अशी ठिकाणे.संगमेश्वर तालुक्याच्या कुशीमध्ये वसलेल्या मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ देवरूखपासून १७ किमी अंतरावर आहे. मार्लेश्वर हे एक शंकराचे मंदिर असून ते सह्याद्री पर्वतात प्राचीन गुहेत आहे. मार्लेश्वर हे एक जागृत शिवलिंग आहे, असे सांगितले जाते. गुहेला लागूनच प्रसिद्ध बारमाही धबधबा आहे.
(सदर फोटो मार्लेश्वर तीर्थक्षेत्र इथला आहे फक्त सौंदर्य संदर्भ म्हणून घेतलेला आहे.)

देवरुख गावाजवळच एका पर्वतात टिकलेश्वर हे प्रसिद्ध शिवमंदिर आहे.हे शिवमंदिर देवरुखपासून ५ किलोमीठर अंतरावर आहे.येथील टेकडीवरुन आपल्याला तीन गावे दिसतात. केदारलिंग मंदिर हे भेट देण्सायारखे ठिकाण आहे.देवरुखपासून १०किमी अंतरावर असलेल्या केतवली गावाचे हे ग्रामदैवत आहे.हे शिवमंदिर आहे. संगमेश्वर येथील प्रसिद्ध कर्णेश्वराचे मंदिर हे हेमाडपंथी शैलीचे आहे. हे मंदिर देवरुखपासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे.संगमेश्वर हे देवळांचे गाव आहे. या परिसरात सुमारे ७० पांडव कालीन देवालये आहेत. त्यातले कर्णेश्वराचे एका दगडातून कोरलेले भव्य देऊळ विशेष प्रसिद्ध आहे. ह्या महादेवाच्या देवालयात ५ पालथी ताटे कोरलेली आहेत. आख्यायिकेनुसार पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण नामक राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून हे देवालय कोरले. त्यानंतर थकून भागून ते जेवायला बसले असता कोंबडा आरवला. पांडव तसेच त्यांची ताटे पालथी टाकून उठले. देवालयात पांडवकालीन लिपीत कोरलेले लेख आहेत. जेव्हा हे लेख कोणी वाचू शकेल तेव्हा पालथी पाने सुलटी होतील आणि त्या मनुष्याला ताटांखाली लपलेले द्रव्य मिळेल, अशी समजूत आहे. कर्णेश्वराच्या देवालयाजवळ एक सूर्य मंदिर आहे..संगमेश्वर तालुक्याचे काळीज देवरुख सोळजाई ही देवरुखची ग्रामदेवता आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला ते विशाळगड किल्ला असा प्रवास करत असताना या देवळाला वेळोवेळी भेट दिली आहे.भारतातील अनेक लोकांनी या देवळाला भेट दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी देवरुखला वेळोवेळी भेट दिली आहे.तसेच शिवाजी महाराजांनी बरेचदा श्री सोळजाई मातेच्या मंदिरालाही भेट दिली आहे.रायगड आणि विशाळगड हे देवरुखपासून सर्वात जवळचे किल्ले आहेत. देवरुखमध्ये चौसोपी हे ठिकाणसुद्धा प्रसिद्ध आहे.छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात या ठिकाणी घोड्यांचा तबेला होता.कवी कलश हे तेथील सर्व व्यवस्था पाहत.देवरुख पासून जवळच अंदाजे ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य सौंदर्यात वसलेल्या ताम्हाणे गावात हि हरीहरेश्वर अर्थात भोयरे हे देवस्थान आहे. संगमेश्वर हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेला तालुका आहे. संभाजीराजांचे मुख्य ठाणे शृगारपूर हे संगमेश्वरच्या जवळच आहे.संगमेश्वर तालुका हा पर्यटनास अनकूल आहे असे जाहिर आहे.
      मुख्यत संगमेश्वर तालुक्यात स्थानिक लोकांना रोजगार म्हणून खूप सोईसुविधा उपलब्द झाल्या असत्या पण ते राहिले ते राजकारणी नेत्यांच्या राजकारणामुळे.आता संगमेश्वर तालुक्याला विकासाच्या गतीची झळ लागता लागता अधोगतीची झळ लागली आहे.पूर्वी संगमेश्वर पासून देवरुख जायचे म्हटले कि,एक वेगळाच आनंद भेटायचा.परजिल्ह्यातून लाखो लोक या संगमेश्वर ला भेट द्यायचे.पण आता ती परिस्थिती बदलली आता ओळ्ख झाली ती रस्त्यातील खड्ड्यांनी भरलेले  शहर,बेरोजगारीने तरुणाई चे स्थलांतर,नित्कृष्ट आरोग्य सेवा,सरकारी कामांचा ढिसाळ कारभार, आधुनिक जगात मोबाईल नेटवर्क चा अभाव,पाण्याने वेढलेल्या संगमेश्वर ला पाण्याचा अभाव,मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या लाकूडतोडीचा तालुका आणि इत्यादी.हे सर्व डोळ्यासमोर घडत असताना सुद्धा नागरिक शांत आहेत याचा अर्थ रक्त सुकलंय,आटलेय कि मेले याचा सुगावा ण लागू देणाऱ्या,गप्प गुमान शांत बसणाऱ्या,अन्याय होताना बघतोय तरी बंड पुकारायचा नाही.शांत बसायचे आणि दर पाच वर्षाने सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद घ्यायचा,नारळावर हाथ ठेवायचा आणि मतदान करायचे याचा अर्थ जिवंत मुडद्यासारखे जगणे जगायचे.त्रास होतोय मात्र त्यावर आवाज उठवयाचा नाही फक्त त्याचा राग घरी काढायचा.ज्यांना निवडून दिले त्यांची कायच चुकी नाही असे मी इथे मानतो कारण अन्याय सहन करणारा हा जिवंत मनुष्य मुडद्याप्रमाणे असतो हे त्यांना माहिती आहे.पितृपक्ष कार्य झाले कि मयत माणसे मुक्त होतात हे हि त्यांनी अवलंबले आहे.याच तालुक्यात मंत्री आणि आमदार अशी मोठी पदे लाभलेले नेते झाले पण आता संगमेश्वर तालुक्याकडे बघायला कोणाला फुरसत नाही.देवरुख गावात श्री.शंकर धोंडशेठ सार्दळ आणि त्यांची मुलगी विमल शंकर सार्दळ हे स्वातंत्र्यसैनिक होते. श्री. शंकर धोंडशेठ सार्दळ यांनी विनोबा भावे यांच्यासोबत भू-दान चळवळीमथ्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.शंकर सार्दळ यांनी लिला विशंभर हे कानडी साहित्य मराठीमध्ये भाषांतरित केले,असे अनेक समाजसेवक,क्रांतीकारकानी या मातीसाठी आपले जीवन खर्ची केले आहे.
      संगमेश्वर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी देवरुखला वेळोवेळी भेट दिली आहे.तसेच शिवाजी महाराजांनी बरेचदा श्री सोळजाई मातेच्या मंदिरालाही भेट दिली आहे.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरणस्पर्श झाले म्हणून देवरुख शहराला क्रांतिभूमी म्हणून पण संबोधले जाते.अनेक क्रांतिकारक यांनी भेट दिली आहे.श्री. शंकर धोंडशेठ सार्दळ यांनी विनोबा भावे यांच्यासोबत भू-दान चळवळीमथ्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.शंकर सार्दळ यांनी लिला विशंभर हे कानडी साहित्य मराठीमध्ये भाषांतरित केले.असे अनेक समाज सेवक होवून गेले.खरच त्यांच्या विचारांच्या जोडीची गरज आहे या तरुणाईला.अन्यायकारक गोष्टींवर आवाज उठवायचा नाही,त्रास होतोय तरी शांत बसायचे म्हणजे नक्कीच हि मुडद्याची लक्षणे आहेत.
          आता वेळ आली आहे ती परिवर्तन करायची आपला हक्क मागायची , आपण ज्यांना निवडून देतो ते कोणी दादा,भाई,भाऊ,साहेब नाहीत ते आपले लोकसेवक असतात.त्यांनी आपली विकासकामे करावीत हेच त्यांचे काम असते.त्यांच्या पाठी पाठी फिरून हाजी हाजी करण्यापेक्षा विकासासाठी “एकत्र होऊ आणि बदल घडवू” या तत्वावर क्रांती घडवून आणण्याची वेळ आली आहे.लाखो रुपये खर्च करून पाण्याचा प्रश्न ऐरणीवर,रोजगारीचा मुद्दा मांडून बेरोजगार तरुणांचे संख्याबळ जास्त,कोट्यावधी खर्च करून रस्ते झाले खड्डेमय,नित्कृष्ट आरोग्य सेवा,अविकसित एमआयडीसी क्षेत्र,वेळेवर न सुटणाऱ्या परिवहन मंडळाच्या गाड्या,जग चाललेय आधुनिकीकरणाकडे तरीही मोबाईल नेटवर्क चा अभाव,पर्यटनास अनकूल असून अविकसित तालुका,सरकारी कामकाजाचा ढिसाळ कारभार, अनेक गावामध्ये डांबरीकरण नाही,रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाने बोंबाबोंब,बंधारे बांधून काय उपयोग “पाणी अडवा आणि जिरवा” असे असताना “सरकारी निधी अडवा आणि जिरवा” असे चाललेय,महावितरणच्या कामांचा अविकास असे अनेक प्रश्न असताना शांत बसणारे,अन्याय सहन करणारे आणि कोणी आवाज उठवायचा प्रयत्न केला कि भावनिकदृष्ट्या शांत बसविणारे “जिवंत मुडदे” आहेत.निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्याच्या सर्वागीण विकासाची हाक देणारे नेते आणि निवडणूक जिंकल्यावर पाठ फिरवणाऱ्या नेत्यांना हि तर सवय झाली आहे आणि कोणी निवडून आला तरी त्यालाही या मुडद्याची सवय होणार हे नक्की.जोपर्यंत विकास करण्यासाठी,बदल घडविण्यासाठी,क्रांती घडवून आणत नाहीत.
एकत्र येऊ अन् क्रांती घडवू,
झुरून मरण्यापेक्षा लढून मेलेलं बर,
भ्रष्ट नेत्यांची आपण जिरवू,
पाठीशी आहेत शिव-फुले-शाहू-आंबेडकर
  
लेखक
अमोल (भंडारा)लवु गायकर-जो पर्यंत फोटोवर हार चढत नाही तो पर्यंत हार मानणार नाही
*संगमेश्वर टाईम्स*
माहिती अधिकार कार्यकर्ता  
मोबा-८८९८५४५०७०




Friday, September 27, 2019

संगमेश्वर मध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये अनेक महिलांचा पक्षप्रवेश

संगमेश्वर मध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये अनेक महिलांनाचा पक्षप्रवेशकेंद्रात पंतप्रधान मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून केला पक्ष प्रवेश.


देवरुख(संगमेश्वर टाईम्स)- राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचे रंग चढू लागले आणि पुन्हा नव्याने संघटन उभारणी सुरू झाली. देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून देवरुख येथे  भाजपा नेत्यांच्या उपस्थिती मध्ये संगमेश्वर च्या महिला शक्ती केंद्र प्रमुख सौ. कोमल रहाटे यांच्या नेत्तुत्वाखाली तालुक्यातील अनेक महिलांनी पक्षप्रवेश केला.यावेळी भारतीय जनता पार्टी चे जिल्हा अध्यक्ष दिपकजी पटवर्धन साहेब ; संगमेश्वर भाजपा तालुका अध्यक्ष प्रमोदजी अधटराव ; सरचिटणीस अमितजी केतकर ; महीला तालुका अध्यक्ष संगीताताई जाधव , युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रुपेश कदम , महीला जिल्हा उपाध्यक्षा दिपीका ताई जोशी ; देवरुख शहराध्यक्ष सुधिर यशवंतराव , युवा तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम , जेष्ठ नेते शेट्ये  गणेश पवार आदी पदाधिकारी यांच्या उपस्थिती होती. हा पक्षप्रवेश भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी साहेब व महाराष्ट्रा मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवुन करण्यात आला असेही महिलांनी आपले मत व्यक्त केले.
संगमेश्वर टाईम्स

स्वतची नोकरी सांभाळता सांभाळता,विनोद लोखंडे या मराठी तरुणाचे नाव नृत्यात लौकिक.(संगमेश्वर टाईम्स)


स्वतची नोकरी सांभाळता सांभाळता,विनोद लोखंडे या मराठी तरुणाचे नाव नृत्यात लौकिक.(संगमेश्वर टाईम्स)
छंद म्हणून आजतागायत आपण सरकारी नोकरी करणाऱ्यांनी वाचणे,लिहिणे,पोहणे,फिरणे इत्यादी छंद जोपासले पाहिले पण मनापासून आपली नोकरी सांभाळता सांभाळता विनोद लोखंडे यांनीहि “डान्स” हा छंद जोपासला,ज्यामुळे  त्यांचे नाव लौकिक झाले.एखादा छंद करण्यासाठी तेवढीच आवड आणि सवड या दोन्ही असल्या पाहिजेत.आपल्या संगमेश्वर टाईम्स कडून त्यांच्या मेहनतीची ,छंदाची दखल घेतली गेली.
श्री.विनोद लोखंडे यांच्याकडून घेतलेली मुलाखत.(नक्कीच प्रेरणादायक)


संगमेश्वर टाईम्स(प्रतिनिधी) - -आपण कोण आहोत?
उत्तर: नमस्कारी, मी एक माणूसकी जपनारा एक माणूस आहे आणि माझ नाव विनोद भिमचंद्र लोखंडे आहे.मी बी.एम.सी. येथे काम करत असुन माझा "डान्स" हा आवडता  छंद असल्याने लोक मला डान्सर, कोरिओग्राफर आणि अभिनेता म्हणून बोलतात.

संगमेश्वर टाईम्स(प्रतिनिधी) - -आपण हा छंद का जोपासला आणि  यामध्ये खरे प्रेरणा स्थान आणि मार्गदर्शक कोण?
उत्तर: मी हा छंद जोपासला नाही तर माझ्यात तो जन्मता आहे व यामध्ये खरे प्रेरणा स्थान माझे आई वडील भाऊ "मनोज लोखंडे क्रिकेट मास्तर" बहीन कविता पटेल (लोखंडे)हाऊस वाईफ आहे.
गुरू नृत्यदिग्दर्शक सागर म्हाडोलकरगुरू अभिषेक झवेरी,तसेच माझे मित्र परिवार आणी माझे मार्गदर्शक "डॉक्टर अशोक ईगंळे" साहेब, "डॉक्टर भुपेंद्र पाटील" साहेब.

संगमेश्वर टाईम्स(प्रतिनिधी) - -आज पर्यंत या छंदाच्या मार्फत आज पर्यंत काय काय केले?
उत्तर: मी या छंदाच्या मार्फत जवळ जवळ 13 वर्ष  डान्स क्लास चालवलेले,मतिमंद मुलांना Free of cost  प्रशिक्षण दिले,कॉलेजस ला देणग्या दिलेत.स्टूडंन्सला रिअलिटी डान्स शो मध्ये सहभाग दिला.खूप सारे स्टेज शो केले बॉलिवुड कलाकार जॉनी लिव्हर, गोविंदा..मराठी कलाकार भरत जाधव, केदार शिंदे असे अनेक नामांकित कलाकारांना  सोबत काम केले,मराठी गाणी  कोरिओग्राफर करे पर्यंत ते लीड अभिनेता पर्यंत काम केले, "शेखर शर्मा" "पी.डी.शर्मा" समीर भटनागर यांचा  बाॅलिवुड हिन्दी मुव्ही "चाहत या नशा" यातील टायटल गाणे "करू मे तेरी बंदगी" हे गाणं कोरिओग्राफ केले या लिंक वर आपण पाहु. शकता. https://youtu.be/NwV8YB0LIgQ

संगमेश्वर टाईम्स(प्रतिनिधी) -आणि आपण जनतेला काय संदेश देऊ इच्छिता?
उत्तर:संदेश असा आहे की, या "समाजाला" आपले देणे आहे ते आपन दिले पाहिजे...! "समाज" म्हणजे जात, पात, धर्म नाही "समाज" म्हणजे माणूस. तर कलाकार कलेतून तर खेळाडू आपल्या खेळातून देत असतात इत्यादी.


संगमेश्वर टाईम्स(प्रतिनिधी) - -आपल्याला या मध्ये कोण कोणत्या अडचणी आल्या आणि त्यातून आपण कसे बाहेर पडलात ?
उत्तर:अडचणी तर विचारू नका, ते येत असतात पण त्यांना न घाबरता स्वतःवर विश्वास ठेऊन आपल्या कामात सुधारणा करून पुढे चालत चालत रहावे, मी हेच केले. आणि हेच केले पाहिजे अस मला तरी वाटतं...

श्री विनोद लोखंडे आपणास संगमेश्वर टाईम्स  टिम तर्फे पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा 


Thursday, September 26, 2019

संगमेश्वर मधील कोसुंब-देवरुख मार्गावरील खड्ड्यांमुळे मानदुखी-पाठ्दुखीमुळे नागरिक त्रस्त;लोकप्रतिनिधी मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त.


संगमेश्वर मधील कोसुंब-देवरुख मार्गावरील खड्ड्यांमुळे मानदुखी-पाठ्दुखीमुळे नागरिक त्रस्त;लोकप्रतिनिधी मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त.

(सदर लेख हा संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून लेखक अमोल गायकर लिखित आहे)
संगमेश्वर(अमोल गायकर):कोकणातील संगमेश्वर तालुका म्हटला कि,देवभूमी,स्मारक पुरातन मंदिरे आणि शिवकालिन वास्तु यांनी नटलेला एक स्वर्गच म्हणता येईल.निवडणूक आली कि, “दे नारळ आणि कर भूमिपूजन” अशी राजकिय नेत्यांची नाटके सुरु होतात,आणि मतदार त्यांना भुलतात असेही चित्र समोर येते.गेले एक ते दीड वर्ष संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब  शाळेच्या जवळून देवरुख च्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर तसेच मच्छीमार्केट पूल,मैत्री पेट्रोल पंप,कांजीवरा त्याचप्रमाणे संगमेश्वर तालूक्यातील प्रसिद्द तिर्थक्षेत्र “श्री मार्लेश्वर” या देवस्थानाच्या दिशेने जाणारा मार्ग पूर्णपणे खड्डेमय झाला आहे.हे मुख्य मार्ग हे तेथिल नागरिकांच्या रोजच्या प्रवासात येणारे असल्याने थोडक्यात हे मार्ग सामान्य नागरिकांसाठी “लाईफलाईन” म्हणून ठरतात.संगमेश्वर तालुक्यातील देवरुख हे शहर म्हणजे तालुक्याचे काळीज आहे .देवरुख शहरामध्ये तालुक्याची शासकिय कार्यालये,उपजिविकेचा मार्ग,शाळा-महाविद्यालये,पोलिस ठाणे,एस.टी डेपो,महत्वाची रुग्णालये,आई सोळजाई चे प्राचिन मंदिर अशा अनेक विविधतेने नटलेल्या देवरुखला नागरिकांचा रोजचा संपर्क असतो.एवढेच नाहीतर आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा संपर्क साधणारा मार्ग हाहि खड्डेमय झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.काहि दिवसांपूर्वी याच मार्गाच्या विकासासाठी कोट्यावधी निधी मिळाला असल्याचा प्रचार हि जोरदार सुरु होता मग हा त्रास नागरिकांना का?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.निवडणूक आली कि,राजकिय नेते संगमेश्वर आपले घर समजून ठाण मांडतात ,मोठमोठी आश्वासने हि देतात आणि नंतर पुन्हा ५ वर्ष “जैसे थे” परिस्थिती आहे.संगमेश्वर सारख्या विविध अलंकाराने नटलेल्या स्वर्गाला आणि अतिमहत्वाच्या देवरुख शहराच्या काळजाला छिद्रे पाडण्याचे काम लोकप्रतिनिधी करताना दिसून येत आहेत.याच संगमेश्वर मध्ये दोन महत्वाची पदे सांभाळणारे आमदार हि झाले पण ते सुद्धा सर्व पाहून शांत बसल्याचे दिसून येते.संगमेश्वर तालुका खड्डेमय झाला असून नक्कीच जर खड्डेगणना झाली तर विक्रमी नोंद व्हावी अशीही इच्छा बाळगणारे लोकप्रतिनिधी स्वार्थापोटी जनेतला वेठीस धरण्याचे काम करित असल्याचे स्पष्ट होत आहे.
          मागील काही दिवसापासून मुसळधार पडणाऱ्या पावसाने या मार्गावरील खड्डे चिखलाने भरले पण शासनाच्या ढिसाळ कारभाराचे पितळ मात्र उघडे पडले.एखादा मंत्री किंवा मोठा नेता यायचा म्हटल्यास हे रस्ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये दुरुस्त केले जातात हेही आता जनतेला समजले आहे.संगमेश्वर तालुक्यातील मुख्य तसेच अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले असून नागरिकांना या त्रासाला रोजच बळी पडावे लागत आहे.या खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालकांना ,एस.टी प्रवाशांना आणि ईतर सर्व प्रवाशांना पाठदुखी-मानदुखी,मणक्याचे आजार तसेच पायांच्या स्नायूंचे आजाराला बळी पडावे लागत आहे.नागरिकांना त्यांच्या जीवनात आधीच महागाई आणि त्यात या आजारच्या त्रासाचा तणाव यामुळे उच्च रक्तदाब ,मानसिक तणावपूर्ण जगावे लागत आहे.आपण खात असलेल्या अप्रत्यक्ष-प्रत्यक्ष अन्नात असलेल्या भेसळीमुळे हाडांना होणारा कॅल्शिअम चा अपुरा पुरवठा,सूर्यप्रकाशाचा अभाव यांच्यामुळे मानवी शरीरातील हाडांची झीज होण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्यांमध्ये भर म्हणून या रस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांचे साम्राज्य आणि त्यामुळे होणाऱ्या दुखापती,आजार .खड्ड्यांतून रोजचा प्रवास करताना अनेकांच्या गाड्यांना झटके बसत असल्याने,एस.टी चालक ,रिक्षाचालक आणि रोजची बाइकस्वार यांना या पाठदुखी-मानदुखी ,मणक्यांच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे आणि त्याचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येत आहे.चारचाकी वाहने सुरक्षित असतात पण त्या वाहन चालकांना सुद्धा या खड्ड्यांच्या झटक्यामुळे पायांवर येणारा ताण स्नायुंवर भार देतो तसेच त्यांना पायांच्या हाडामध्ये येणाऱ्या दोषाला बळी पडावे लागते.एखादा गंभीर रुग्ण ,प्रसूतीसाठी जाणारी महिला यांना घेवून जाणारी रुग्णवाहिका हि या खड्यांमुळे उशिरा तसेच खड्डेमय रस्त्यामुळे “मौत का कुआ” सारखी सर्कस करावी लागल्याने कधी कधी जीवितहानी सारख्या दुर्घटनेला बळी पडावे लागते.विशेष म्हणजे रस्त्यावरील खड्ड्यात अजून भर म्हणून नादुरुस्त गतीरोधक,रस्ते दुरुस्त करण्यासाठी सुरु असलेली अपूर्ण कामे यांच्यामुळे अपघातासारखे प्रकार वाढत निघाले आहेत.हा प्रकार नागरिकांच्या जीवांशी खेळत असल्याचे दिसून येत आहे.हा खड्डे अपघात ,त्यामुळे होणारा त्रास हा दहशती ह्ल्ल्यांपेक्षा कईक पट्टीने जास्त असून नागरिक ताणतणावामध्ये जगताना दिसून येत आहे.उपजीविकेसाठी घेतलेली रिक्षा,बाईक इतर वाहने यांच्या मालकांना हे आजार खर्च  आहेतच आहेत पण याच खड्ड्यांमुळे वाहनांना होणाऱ्या दुरुस्तीचा खर्च हि त्यांच्या तुटपुंज्या कमाईवर भर देतो त्यामुळे त्यांचे जीवन मानसिक तणावग्रस्त असून धोकादायक स्थितीत असल्याचे दिसून येते.या सर्वांमध्ये मात्र लोकप्रतिनिधी,शासकिय ठेकेदार,अधिकारी  हे खेळीमेळीचे जीवन जगताना दिसून येत आहे त्याचप्रमाणे सरकारी रुग्नालायातील अपुऱ्या सेवेमुळे बाकीच्यांना सुद्धा जीवन खेळण्याचे वाटू लागले आहे.. भविष्यात या भ्रष्ट कारभाराला नक्कीच वाचा फुटेल पण त्याआधी नागरिकांनी सुद्धा यावर आवाज उठवून क्रांती करावी अशी सामाजिक कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.संगमेश्वर,देवरुख,कोसुंब,मार्लेश्वर, ताम्हाणे यांसारख्या विविधतेने नटलेल्या निसर्गमय अलंकारांची जडण असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील स्वर्गामय सौंदर्याला मात्र गालबोट लावण्याचे प्रकार या लोकप्रतिनिधी कडून केले जातात तरीही अशा भ्रष्ट प्रवाहात वाहणाऱ्या नागरिकांची कीव येतेच परंतु  त्यांच्या या अन्याय सहन करून शांत बसण्याची शोकांतिका वाटते.
लेखक
अमोल (भंडारा)लवु गायकर
*संगमेश्वर टाईम्स*
माहिती अधिकार कार्यकर्ता   
मोबा-८८९८५४५०७०






Tuesday, September 24, 2019

संगमेश्वर टाईम्स(हा वारसा निर्भीड पत्रकारितेचा,लढा अस्तित्वासाठी ,आवाज लोकशाहीचा)



हा वारसा निर्भीड पत्रकारितेचा
अन्यायाविरुद्ध बंड  पुकारुनी फोडील वाचा !!
होणार नक्की नागरिक समस्या निवारण
प्रत्येक घटनेवर आवाज करू क्षणोक्षण! !
भ्रष्टाचाऱ्यांची शिजू देणार नाही डाळ
ठरणार अवैध व्यवसायांचा कर्दनकाळ !!
पीडितांच्या हाकेवर देणार आम्ही बळ
जनतेच्या हक्काचे हेच आहे संरक्षण दल !!
हातातल्या लेखणीला तलवारीची धार
भ्रष्टाचारी राक्षसावर करू आम्ही वार !!
भ्रष्ट नेत्यांवर सोडू  संगमेश्वर टाईम्स चा बाण
आम्ही घेतलीय जनहितार्थ सेवेची आण !! 
जनहितार्थ आम्ही करतोय आता आरंभ
जगवू लोकशाहीचा आपण चौथा स्तंभ !!
असा हा वारसा आहे निर्भीड पत्रकारितेचा
लढा अस्तित्वासाठी ,आवाज लोकशाहीचा !!
कवी
अमोल लवु गायकर
संपादक
संगमेश्वर टाईम्स




Monday, August 12, 2019

सांगलीत मदतीला आलेल्या जवानांना निरोप देताना एक व्हिडियो (जय हिंद म्हणून आवर्जून कॉमेंट करा)


खरच एक माणुसकीचे चित्र ना जात ना धर्म हे फक्त कर्तव्य 


सांगलीत मदतीला आलेल्या जवानांना निरोप देताना
खरंच जवान हे मनापासून मानले तर देवदूत म्हणायला पाहिजे.इतके दिवस जवान,पोलिस, डॉक्टर स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता यांनी अहोरात्र ,दिवस काही न बघता कधी रडणाऱ्या मुलाला हसवले तर वासुदेव बनून त्यांना वाचवले.
मनापासून जयहिंद.
मनापासून जय हिंद म्हणून कॉमेंट करा एक सलाम माझ्या जवान बांधवाना.

Friday, August 9, 2019

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सरचिटणीस, माजी खासदार सन्मा.निलेशजी राणे यांचा पुढाकार.


🔵 महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे रत्नागिरी तालुक्यातील पूरग्रस्त गावांना उद्या मोफत दूध वाटप.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सरचिटणीस, माजी खासदार सन्मा.निलेशजी राणे यांचा पुढाकार.

रत्नागिरी-
            माजी खासदार सन्मा श्री निलेशजी राणे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी,चांदेराई ,गावडे-आंबेरे आणि सोमेश्वर आदी पूरग्रस्त गावांना उद्या शनिवार दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजलेपासून मोफत दुधाचे वाटप करण्यात येणार आहे.तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सदर गावी उपस्थित राहावे.

Thursday, August 8, 2019

खासदार,महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस मा.निलेशजी राणे साहेब पाहणी दौऱ्यावर

खासदार,महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस मा.निलेशजी राणे साहेब पाहणी दौऱ्यावर...



सत्ताधारी आणि प्रशासन कुठे आहे माहीत नाही मात्र राणे कुटुंबीय कोकणवासीयांना सेवेत ग्राउंडवर आहेत. निलेशजी राणे यांनी मालवणात तालुक्यातील पर्जन्यबाधित गावांचा आज पाहणी दौरा केला यात काळसे, तोंडवळी, तळाशील गावांना भेटी दडवून परिस्थितीची पहाणी केली.

कोकणाबरोबर कोल्हापूरमध्येही माजी खासदार निलेश राणेजींचे मदतकार्य सुरुच


कोकणाबरोबर कोल्हापूरमध्येही माजी खासदार निलेश राणेजींचे मदतकार्य सुरु.
    
कोकण म्हटले कि,अखंड राणे कुटुंबच नेते म्हणून ओळखले जातात.माजी मुख्यमंत्री खासदार ,महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापकीय अध्यक्ष 

 मा.नारायण अर्थात दादासाहेब राणे नाव हे त्यांच्या स्वभावामुळे आणि कामकाजामुळे ओळखले जाते.त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्रात कुठेही

असो, मदत हि केलेली आहे .त्यांचा वारसा त्यांची मुले चालवत आहेत.कोणाला दवाखान्याची मदत असो कि कोणतीही कोकणात मदतीसाठी आणि त्यांच्या जनहितार्थ आक्रमक रित्या जनतेच्या प्रश्नांसाठी रस्यावर स्वत: उतरणे आणि न्याय मिळवायचा या साठी ते नेहमीच चर्चेत असतात.आज सकाळी आमदार मा.नितेश नारायणराव राणे यांच्या कडून ५००० लिटर दुधाचे मोफत वाटप केले आणि आता तर अजून कोणतीही मदत असो त्यासाठी तप्तर आहोत असे सांगण्यात येते .
      या अतिवृष्टीमुळे पावसाच्या पाण्याचा योग्य तो निचरा न झाल्यामुळे हाहाकार माजला आहे.माजी खासदार निलेशजी राणे यांच्या कडून कोल्हापूरमध्ये पडलेल्या अतिवृष्टीमध्ये मदत केल्याबद्दल महाराष्ट्र  स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कौतुकाचे ट्वीट करण्यात आले त्याच प्रमाणे जनतेला कोणत्याही मदतीची गरज असल्यास महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आपल्या मदतीसाठी तयार आहे,ज्यांना मदत हवीय त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री.सचिन तोडकर (९०९६८०७८८८ ) यांना संपर्क करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.माजी खासदार निलेशजी राणे हे सुद्धा आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्व,स्पष्ट वक्तेपणा आणि जनहितार्थ आक्रमक स्वभावामुळे पूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहेत.अनेक बंद झालेल्या कंपनीच्या  कर्मचारी ह्यांना सहाय्य करणे त्यांच्या हक्कासाठी आक्रमक पावित्रा घेणे,मदत कोणालाही आणि कुठेही असो मग तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी  असला तरी चालेल पण मदत हि करायचीच अशा अनेक कारणामुळे ज्यांना ओळखले जाते.कोकणातच नव्हे तर कुठेही, हे राणे कुटुंबीय नेहमीच मदती साठी आणि लोकांच्या मागण्यासाठी आक्रमक रहाण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात.
आपण जनतेच्या सेवेसाठी जन्म घेतला आम्ही या मातीचे कायतरी देण पडतो ,जनतेच्या हितार्थ कोणतीही भूमिका स्विकारणे हेच आमचे कर्तव्य आहे असे त्यांच्या बोलण्यातूनहि आणि वागण्यातूनहि  दिसून येते.
     माजी खासदार ,महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस मा.निलेशजी राणे यांचे ट्वीट.....







कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...