Monday, August 12, 2019

सांगलीत मदतीला आलेल्या जवानांना निरोप देताना एक व्हिडियो (जय हिंद म्हणून आवर्जून कॉमेंट करा)


खरच एक माणुसकीचे चित्र ना जात ना धर्म हे फक्त कर्तव्य 


सांगलीत मदतीला आलेल्या जवानांना निरोप देताना
खरंच जवान हे मनापासून मानले तर देवदूत म्हणायला पाहिजे.इतके दिवस जवान,पोलिस, डॉक्टर स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता यांनी अहोरात्र ,दिवस काही न बघता कधी रडणाऱ्या मुलाला हसवले तर वासुदेव बनून त्यांना वाचवले.
मनापासून जयहिंद.
मनापासून जय हिंद म्हणून कॉमेंट करा एक सलाम माझ्या जवान बांधवाना.

Friday, August 9, 2019

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सरचिटणीस, माजी खासदार सन्मा.निलेशजी राणे यांचा पुढाकार.


🔵 महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे रत्नागिरी तालुक्यातील पूरग्रस्त गावांना उद्या मोफत दूध वाटप.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सरचिटणीस, माजी खासदार सन्मा.निलेशजी राणे यांचा पुढाकार.

रत्नागिरी-
            माजी खासदार सन्मा श्री निलेशजी राणे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी,चांदेराई ,गावडे-आंबेरे आणि सोमेश्वर आदी पूरग्रस्त गावांना उद्या शनिवार दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजलेपासून मोफत दुधाचे वाटप करण्यात येणार आहे.तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सदर गावी उपस्थित राहावे.

Thursday, August 8, 2019

खासदार,महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस मा.निलेशजी राणे साहेब पाहणी दौऱ्यावर

खासदार,महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस मा.निलेशजी राणे साहेब पाहणी दौऱ्यावर...



सत्ताधारी आणि प्रशासन कुठे आहे माहीत नाही मात्र राणे कुटुंबीय कोकणवासीयांना सेवेत ग्राउंडवर आहेत. निलेशजी राणे यांनी मालवणात तालुक्यातील पर्जन्यबाधित गावांचा आज पाहणी दौरा केला यात काळसे, तोंडवळी, तळाशील गावांना भेटी दडवून परिस्थितीची पहाणी केली.

कोकणाबरोबर कोल्हापूरमध्येही माजी खासदार निलेश राणेजींचे मदतकार्य सुरुच


कोकणाबरोबर कोल्हापूरमध्येही माजी खासदार निलेश राणेजींचे मदतकार्य सुरु.
    
कोकण म्हटले कि,अखंड राणे कुटुंबच नेते म्हणून ओळखले जातात.माजी मुख्यमंत्री खासदार ,महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापकीय अध्यक्ष 

 मा.नारायण अर्थात दादासाहेब राणे नाव हे त्यांच्या स्वभावामुळे आणि कामकाजामुळे ओळखले जाते.त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्रात कुठेही

असो, मदत हि केलेली आहे .त्यांचा वारसा त्यांची मुले चालवत आहेत.कोणाला दवाखान्याची मदत असो कि कोणतीही कोकणात मदतीसाठी आणि त्यांच्या जनहितार्थ आक्रमक रित्या जनतेच्या प्रश्नांसाठी रस्यावर स्वत: उतरणे आणि न्याय मिळवायचा या साठी ते नेहमीच चर्चेत असतात.आज सकाळी आमदार मा.नितेश नारायणराव राणे यांच्या कडून ५००० लिटर दुधाचे मोफत वाटप केले आणि आता तर अजून कोणतीही मदत असो त्यासाठी तप्तर आहोत असे सांगण्यात येते .
      या अतिवृष्टीमुळे पावसाच्या पाण्याचा योग्य तो निचरा न झाल्यामुळे हाहाकार माजला आहे.माजी खासदार निलेशजी राणे यांच्या कडून कोल्हापूरमध्ये पडलेल्या अतिवृष्टीमध्ये मदत केल्याबद्दल महाराष्ट्र  स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कौतुकाचे ट्वीट करण्यात आले त्याच प्रमाणे जनतेला कोणत्याही मदतीची गरज असल्यास महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आपल्या मदतीसाठी तयार आहे,ज्यांना मदत हवीय त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री.सचिन तोडकर (९०९६८०७८८८ ) यांना संपर्क करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.माजी खासदार निलेशजी राणे हे सुद्धा आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्व,स्पष्ट वक्तेपणा आणि जनहितार्थ आक्रमक स्वभावामुळे पूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहेत.अनेक बंद झालेल्या कंपनीच्या  कर्मचारी ह्यांना सहाय्य करणे त्यांच्या हक्कासाठी आक्रमक पावित्रा घेणे,मदत कोणालाही आणि कुठेही असो मग तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी  असला तरी चालेल पण मदत हि करायचीच अशा अनेक कारणामुळे ज्यांना ओळखले जाते.कोकणातच नव्हे तर कुठेही, हे राणे कुटुंबीय नेहमीच मदती साठी आणि लोकांच्या मागण्यासाठी आक्रमक रहाण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात.
आपण जनतेच्या सेवेसाठी जन्म घेतला आम्ही या मातीचे कायतरी देण पडतो ,जनतेच्या हितार्थ कोणतीही भूमिका स्विकारणे हेच आमचे कर्तव्य आहे असे त्यांच्या बोलण्यातूनहि आणि वागण्यातूनहि  दिसून येते.
     माजी खासदार ,महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस मा.निलेशजी राणे यांचे ट्वीट.....







Wednesday, August 7, 2019

स्वाभिमान कडून ५००० लिटर दुधाचे होणार मोफत वाटप-आ. नितेशजी राणे यांचे मदतकार्य


स्वाभिमान कडुन००० लिटर दुधाचे होणार मोफत वाटप.

आ. नितेश राणेंनी पुढे केला देवगडवासीयांना मदतीचा हात.अतिवृष्टीमुळे मार्ग बंद झाल्यामुळे कोल्हापूरहुन देवगडमध्ये जीवनावश्यक सेवा पोहचू शकत नाहीत.
आमदार नितेश राणे यांनी स्वतः दखल घेत देवगड तालुक्यातील जनतेसाठी पुढे केलाय मदतीचा हात.महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने शिरगाव, लिंगडाळ तिठा, तळेबजार, देवगड, जामसंडे, दहीबाव, मिठबाव, पडेल कँटीन व फणसगाव याठिकाणी गुरुवारी सकाळी ९.३० वाजता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे गाई व म्हैशीचे दूध तेही मोफत
नागरिकांनी दूध नेण्यासाठी येत असताना एखादे भांडे किंवा बाटली घेऊन येण्याचे करण्यात आले आवाहन केले आहे त्याचप्रमाणे ,शुक्रवार पर्यंत थेट बेळगावहुन भाजीपालाही देवगडपर्यंत पोहचवणार असल्याची आ. नितेश राणेंनी ट्विटर दिली माहिती.
देवगड तालुक्यातील जनतेने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप साटम यांच्या संपर्क साधावा असे करण्यात आलेय आवाहन .
दमदार आमदार मा.नितेश राणे हे नेहमीच जनतेच्या मदतीला धावत असतात ह्यांनी यापूर्वीही अनेक रुग्ण ,समस्या बाधित लोकांना मदत केलीय आणि जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा आंदोलन करणारा कोकणातील एकमेव आक्रमक युवा नेता म्हणून ओळख असणारे मा.नितेश राणे आहेत.

एक भयाण वास्तव....आणि महापौरावर काय कारवाई?


एक भयाण वास्तव....आणि महापौरावर काय कारवाई?


       आज शिवसेनेचे मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर संदर्भात एक व्हिडियो व्हायरल झाला आणि  Whats app आणि  Facebook तसेच इतर सोशल साईट्स च्या माध्यमातून निषेध नोंदवायला सुरुवात झाली .माझ्याकडूनही प्रथम निषेध आहे.पण मला एक गोष्ट लक्षात येते कि,जनता फक्त २ दिवस सोशल साईट्स च्या माध्यमांतून निषेध नोंदवते, कारण त्यासाठी फक्त दोन मिनटे लागतात टाईप करायला आणि नक्कीच या दोन मिनिटांनी नाक्या-नाक्यावर ,चौका-चौकात या गोष्टी चालतात.आणि त्यानंतर सर्वत्र शांत आणि नवीन विषयाचा निषेध सोशल माध्यमातून नोंदविण्यासाठी तयार होतात.खर म्हणजे सोशल मिडिया मधून मिळणाऱ्या माहितीवर खात्री जमा करून संबधित पिडीत लोकांना मदतीचा त्यांच्या सोबत राहण्याचा आधार देवून त्यावर लोकशाही मार्गाने आंदोलने करून न्याय मिळवायला पाहिजे.पण आपण पाहतो आणि त्यावर शांत बसतो......वास्तविक
         खरे म्हणजे या घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.पण आपण हा विचार केला का,या घटना आजपर्यंत अनेक ठिकाणी याच राजकारणी नेत्यांकडून घडल्या आहेत आणि आजही तेच घडत आहे याचे कारण जनता विसरते,हे त्यांना माहितीय.यापूर्वीही ठाणे मध्ये पोलिस महिलेवर हल्ला ,रत्नागिरी आणि अंबरनाथ येथे अत्याचारामध्ये अटक ,तर छेडछाडी आणि विनयभंगाच्या घटना घडल्यात (सर्वांचा संदर्भ देणे गरजेचे नाही) आज दि.०६ ऑगस्ट २०१९ रोजी परत महिला पत्रकार वर वसई मध्ये हल्ला आणि आता तर मुंबई चे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या कडून न्याय मागायला आलेल्या महिलेचा हात मूरगळला आणि धमकी दिली,अशा या घटनांचा आपण निषेध करतोय पण तो कुठे तर सोशल साईट्स वर बस्स! म्हणजे आपले आपण कर्तव्य पार पाडले याचा आनंद वाटत असेल ना .पण या घटना का घडतात याचा विचार केलात का?......जनता विसरते हे त्यांना माहितीय.
         या महाडेश्वरांनी ज्या वेळी हात मुरगळला त्यावेळी तेथे कुणी नव्हते का कोणी मर्द? का नाही त्याचा हात मुळापासून उखडून काढला नाही .अरे,आपण तर सोशल साईटवर निषेध नोंदवून फक्त कर्तव्य करतो असे वाटते पण एक जबाबदारी शिकवण मात्र तुम्ही विसरताय.छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक शिकवण दिलीय “ एकटी स्त्री हि आपली जबाबदारी आहे ” त्यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही.माझ्या शिवबांनी तर बलात्कारी नराधमांचा “ चौरंग ” केला होता  आणि आता तर युग बदलेले आहे .शिवसेना हा पक्ष शिवरायांच्या विचाराने चालतो असे म्हटले जाते मग या महिलांवर हल्ला करणाऱ्या लोकांना का संरक्षण दिले जात आहे.नावातच “ शिव ”लावले म्हणजे  कोणी महाराजांची विचारधारा अवगत करू शकत नाही.शिवबांनी केलेल्या पराक्रमाचा विसर आज जनतेला पडतोय. “छत्रपती शिवाजी महाराज ” असे नावही कोणी मुखी घेतले तरी अंगातून शहारे आजही येतात. “ अन्यायाविरुद्ध बंड हा पुकारलाच पाहिजे ” आणि न्याय मिळत नसेल मिळवावा हेही शिकवण त्यांचीच आहे.आज खरच महाराज असते तर दोन्ही हात छाटले असते.
         मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांना ओळखले जाते आणि त्यांनीच असा निंदाजनक प्रकार करावा आणि त्यांच्यावर कोणतीच कारवाई न होणे म्हणजे नक्कीच हि बाब अन्यायकारक आहेच पण अशा कृत्याला त्यांचे समर्थन किंवा खतपाणी घातल्यासारखे वाटतेय.मा.बाळासाहेबांनी जी विचारधारा राबविली ती मात्र अशा कृत्यांमुळे कुठेतरी संपुष्टात येतेय असाही भास होतोय. “मला एक शिवसैनिक म्हणाला कि,आज बाळासाहेब असते तर महापौराला गावी जावे लागले कायमचे,परत मुंबई बघितली नसती ”आता हा विचार झाला त्यांचा पण एक मात्र नक्की जनता शांत आहे हे मात्र या शिवरायांच्या मावळ्यांना कुठपर्यंत पटतेय हेही पाहूया.ज्यांच्या नावावरती राजकारण करायचे त्यांचेच विचारधारा आम्ही चालवतोय असे सांगायचे आणि अशी विटंबना करायची हे मात्र पूर्णपणे चुकीचे आहे.माझा हा लेख तर फक्त लेखणीची धार आहे कोणाला आवडेल न आवडेल पण एक भयाण वास्तव मांडण्याचा प्रयत्न चालू आहे.ज्याला आवडेल तो नक्कीच अन्यायाविरुद्ध ,या अत्याचाराविरुद्ध पेटून उठेल पण ज्यांनी हे विचार नाकारले त्यानाही आपल्या शुभेच्छा.पूर्वीचा लेखक लेखणीने मारायचा आम्ही तर या शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या मातीतील  विचारांची बीजे आहोत वेळ पडली तर नक्कीच “ षंड होण्यापेक्षा गुंड होईल ” पण या पुढे माझ्या महापुरुषांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना विरोध हा करणार आणि अशा घटनांचा निषेध करूच पण त्याबद्दल निडरपणे जनजागृती करणारच.कोणी आलाच मध्ये तर “ अफजला सारखा फाडून टाकु ” हे नक्की.
         या लेखामधून सांगण्याचा मुद्दा एवढाच कि,आता आपण पाहू कि महापौरांनी केलेल्या निंदाजनक कृत्यावर सरकार काय शिक्षा देते ती? किंवा सर्व विषय शांत होतात का तेही पाहू .विचार माझे आहेत पण कृती मात्र शिवरायांच्या विचारधारेवर करावी हि विनंती.आवडले तर नक्की शेअर करा आणि अशाच जनजागृती ला सहाय्य करा.(लवकरच पुढचे पाऊल )क्रमशः
जय शिवराय                                           (लेखक –भंडारा )








(मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) ऑगस्ट 2019)

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
आज दिनांक 07 ऑगस्ट 2019 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आले.

1. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसह विधवा लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ.
2. सर्वांसाठी घरे धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागातील अतिक्रमणांबाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय.
3. जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदासाठी होणाऱ्या निवडणुका तात्पुरत्या लांबणीवर.
4. राज्य निवडणूक विभाग नव्याने निर्माण करून त्यासाठी 128 पदे निर्माण करण्याबाबत.
5. केंद्र शासनाच्या निर्भया निधी योजनेत मुंबईसह इतर डीएनए फॉरेन्सिक लॅबच्या सक्षमीकरणाबाबत.
6. गडचिरोली जिल्ह्यातील मौजा नवेगाव येथे केंद्रीय विद्यालयास भाडेपट्ट्याने जमीन देण्याबाबत.
7. चंद्रपूर जिल्ह्यातील मौजे कोर्टी मोक्ता येथे भारत राखीव बटालियन क्र.4 अकोला जिल्ह्यातील मौजा शिसा उदेगाव येथे भारत बटालियन क्र. 4 आणि जळगाव जिल्ह्यातील हातनूर येथे राज्य राखीव पोलीस गट स्थापन करण्यास मान्यता.
8. विद्यापीठ विद्यार्थी परिषदांच्या निवडणुकांबाबत.
9. तिरुपती देवस्थान संस्थेसाठी शासकीय जागा देण्याबाबत.
10. प्रगतीपथावरील पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यास मान्यता.


Tuesday, August 6, 2019

भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन ...... भावपूर्ण श्रद्धांजली

ब्रेकिंग न्यूज (सावधान भारत : सह्याद्री नाऊ )



भावपूर्ण श्रद्धांजली

सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकील आहेत. त्या सध्या भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या असून  भारताच्या माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचे आज एम्स रुग्णालयात हृद्यविकाराच्या आजाराने वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या या निधनामुळे देशभरामध्ये शोककळा पसरली आहे.भाजपा नेते एम्स मध्ये दाखल झाले आहेत.
सुषमा स्वराज यांनी ३७० कलमाचे रद्दीकरण केल्यानंतर चे त्यांचे Tweet पहा


कुर्ल्यामध्ये भाजपा कार्यकर्ते आणि अमित शेलार समर्थक यांच्या कडून कलम ३७० / ३५ - अ हटवण्याच्या निर्णयावर जल्लोषात स्वागत........


कलम ३७० / ३५ - अ हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि कुर्ल्यामध्ये भाजपा युथ उपाध्यक्ष (मुंबई ) च्या अमित शेलार यांच्या सौभाग्यवती,तसेच स्माईल डिलिव्हर  फाउंडेशन च्या उपाध्यक्ष मयुरी अमित शेलार यांनी असंख्य पुरुष आणि महीला कार्यकर्त्यासह कुर्ला विधानसभा परिसरामध्ये या निर्णयाचे स्वागत जल्लोषात केले .
या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करताना खरच आमचा  आनंद द्विगुणीत झाला असून आज खऱ्या अर्थाने देशाला समानतेचे स्वातंत्र्य लाभले याचा मला अभिमान वाटतोय त्याच प्रमाणे मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि मा. केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा धाडसी निर्णय घेऊन भारतिय संविधान आणि संपूर्ण भारत देश एका तिरंग्याखाली आणला म्हणून त्यांच्या नेतृत्वाची आम्ही अभिमानाने साक्ष देऊ असे भाजपा युथ उपाध्यक्ष (मुंबई ) च्या अमित शेलार यांच्या सौभाग्यवती तसेच स्माईल डिलिव्हर  फाउंडेशन च्या उपाध्यक्ष सौ.मयुरी अमित शेलार यांनी असे आपले मत व्यक्त केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घोषणा आज राज्यसभेत केली. जम्मू आणि काश्मीरला विशेषाधिकार देणारे अत्यंत वादग्रस्त कलम ३७० मुळापासून काढून टाकून राज्याची पुनर्रचना करण्याची शिफारस अमित शहा यांनी संसदेत केली आणि आज दिनांक ०५ ऑगस्ट २०१९ सोमवार रोजी मोदी सरकारने जम्मु काश्मीर मधून कलम ३७० / ३५ - अ हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.या निर्णयामुळे
 जम्मू काश्मीरचे विभाजन अर्थात  जम्मू काश्मीर आता राज्य नसून केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर झाले त्याचप्रमाणे  लेह लडाख वेगळा झाला आणि हा  सुद्धा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित झाले एवढेच नाहीतर वेगळा झेंडा,वेगळे सविंधान,ऱाज्याच्या नियंत्रणाखाली पोलीस,दुहेरी नागरिकत्व,विधानसभा कार्यकाळ ६ वर्षे,आरटिआय कायद्यावरील बंदी,बाहेरील व्यक्तीना संपत्ती विकत घेण्यास बंदी या सर्व गोष्टी रद्द झाल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे देशभरात मोठ्या जल्लोषात स्वागत झाले.
         कुर्ला विधानसभा येथे भाजपा युथ उपाध्यक्ष (मुंबई ) च्या अमित शेलार यांच्या पत्नी तसेच स्माईल डिलिव्हर  फाउंडेशन च्या उपाध्यक्ष सौ.मयुरी अमित शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज असंख्य भाजपा कार्यकर्ते तसेच अमित शेलार समर्थक यांनी कुर्ला विधानसभा कार्यालय नेहरूनगर येथे ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक  ,फटाक्यांच्या आतिषबाजीसह तेथिल नागरिकांना पेढे वाटून आनंद साजरा केला .
                                                         











Monday, August 5, 2019

आज ३७० कलम हटले आणि काय रद्द झाले ते पहा (सावधान भारत : सह्याद्री नाऊ)


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घोषणा आज  राज्यसभेत केली. 

जम्मू आणि काश्मीरला विशेषाधिकार देणारे अत्यंत वादग्रस्त कलम ३७० मुळापासून काढून टाकून राज्याची पुनर्रचना करण्याची शिफारस अमित शहा यांनी संसदेत केली आणि आज दिनांक ०६ ऑगस्ट २०१९ सोमवार रोजी मोदी सरकारने जम्मु काश्मीर मधून कलम ३७० / ३५ - अ हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.या निर्णयामुळे
 जम्मू काश्मीरचे विभाजन अर्थात  जम्मू काश्मीर आता राज्य नसून केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर झाले त्याचप्रमाणे  लेह लडाख वेगळा झाला आणि हा  सुद्धा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित झाले एवढेच नाहीतर वेगळा झेंडा,वेगळे सविंधान,ऱाज्याच्या नियंत्रणाखाली पोलीस,दुहेरी नागरिकत्व,विधानसभा कार्यकाळ ६ वर्षे,आरटिआय कायद्यावरील बंदी,बाहेरील व्यक्तीना संपत्ती विकत घेण्यास बंदी या सर्व गोष्टी रद्द झाल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे देशभरात मोठ्या जल्लोषात स्वागत झाले.

चिपळूण - संगमेश्वर मतदारसंघात शिवसेनेला जोरदार धक्का.(सावधान भारत : सह्याद्री नाऊ )

राजकीय ब्रेकिंग.....* 

  चिपळूण - संगमेश्वर मतदारसंघात शिवसेनेला जोरदार धक्का.  


▪ संगमेश्वर तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार सुभाष बने यांचे भाऊ माजी जि.प.सदस्य सुरेश उर्फ बारक्या शेठ बने यांनी शिवसेनेला राम राम करत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला,
त्यांच्या सोबत साडवली गावचे माजी सरपंच संतोष शेठ जाधव, साडवली माजी ग्रा. प. सदस्य *पापा शेठ भिंगार्डे*, ओझरे जि. प. गटातील जेष्ठ कार्यकर्ते किशोर शेठ सावंत,मोगरवणे देवरुख येथील सुभाष शेठ चव्हाण, देवरुख पठारवाडी येथील बाबू शेठ निवळकर  यांनी ही जाहीर प्रवेश केला. 
सुरेश उर्फ बारक्या शेठ बने यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत निवडक सहकारी घेऊन इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीत  जाहीर प्रवेश केला. 
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मा. शेखर निकम सर,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळू शेठ ढवळे, राष्ट्रवादी देवरुख शहर अध्यक्ष हनिफ हारचिरकर,नगरसेवक प्रफुल भुवड, चिपळूण संगमेश्वर राष्ट्रवादी युवक विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेश भुवड*,राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष *पंकज पुसाळकर, नितीन भोसले, मोहन शेठ वनकर, किसन राणे,दिलीप बोथले, प्रवीण टक्के,बंडू जाधव, सिद्धेश वेल्हार, मंगेश बंडागळे, काका बोथले, प्रकाश सावंत, बाबा सावंत, आकाश बोथले, आदी उपस्थीत होते.
    गत काही वर्षापासून शेखर निकम सर यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामान्य जनतेने सुद्धा शिवसेनेतून सोडचिठ्ठी घेतली आहे.राष्ट्रवादीत हे इनकमिंग चालूच आहे .......

सूत्रांच्या माहितीवरून पुन्हा एकदा जोरदार राजकीय भूकंप येत्या आठवड्यात होणार ....... 

कलम 370 मध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत,हे नक्की वाचा

जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम 370 वरून राजकीय नेते आणि पक्षांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे.
अनेक दिवसांनी कलम 370 चा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.

कलम 370 मध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत, त्यांचा संभाव्य फायदा आणि तोटा काय आहे, हे खाली विस्तृतपणे देण्यात आले आहे.
कलम 370 मधील प्रमुख मुद्दे
1) कलम 370 लागू झाल्यामुळे जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे. म्हणजेच हे राज्य विशेष स्वायत्तता असलेले राज्य आहे.
2) कलम 370 मधील तरतुदीअंतर्गत संसदेला जम्मू-काश्मीरसाठी फक्त संरक्षण, विदेश आणि दळणवळणाशी संबंधित प्रकरणांमध्येच कायदा बनवण्याचा अधिकार आहे.
3) इतर कायदे लागू करण्यासाठी त्यांना राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे.
4) या विशेष अधिकारामुळे राष्ट्रपतींना राज्याची घटना बरखास्त करण्याचादेखील अधिकार नाही.
5) कलम 370 मुळेच जम्मू-काश्मीरवर 1976 चा शहरी भूमी कायदा लागू होत नाही. याचाच अर्थ जम्मू-काश्मीरचा रहिवासी नसणारा व्यक्ती जमीन खरेदी करू शकत नाही.
6) एवढेच नाही तर ज्या महिलेने इतर राज्यातील मुलाशी लग्न केले असेल, तर तोसुद्धा येथे जमीन खरेदी करू शकत नाही.
7) याशिवाय ज्यामध्ये देशात आर्थिक आणीबाणी लावण्याची तरतूद आहे ते भारतीय घटनेचे कलम 360 देखील जम्मू-काश्मीरवर लागू होत नाही.
8) भारतातील सर्व राज्यांमध्ये लागू होणारे कायदेसुद्धा या राज्यात लागू होऊ शकत नाहीत.
9) जम्मू-काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. तसेच, इतर राज्यांमध्ये हा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. कलम 370 द्वारे करण्यात आलेली ही विशेष तरतूद आहे.
10) पाकिस्तानने 26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीरवर हल्ला केला होता. त्यानंतर राजा हरिसिंह यांनी भारताला मदत मागितली होती आणि त्यानंतर कलम 370 अस्तित्वात आले.
11) 50 दशकाच्या सुरुवातीपासून भाजप पक्ष कलम 370 च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आला आहे. जम्मू-काश्मीर पूर्णपणे एकीकृत व्हावे, असे त्यांना वाटते.
समर्थनात केले जाणारे तर्क
* कलम 370 कायम ठेवण्याच्या बाजूने बोलायचे झाल्यास या कलमामुळे जम्मू-काश्मीरच्या लोकांना त्यांच्या सोयीनुसार त्यांचे हित आणि कायदे निश्चित करण्याचा अधिकार मिळतो. केंद्र सरकारच्या दबावातून मुक्त होऊन ते स्वत:साठी आपल्या गरजांनुसार कायदा तयार करू शकतात.
* भारत आणि जम्मू-काश्मीर यांच्यात झालेल्या करारांनुसार या राज्याला भारताशी जोडणारा हा कायदा आहे. याचाच उल्लेख करत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितले होते की, कलम 370 ची कायम चुकीची व्याख्या होत आलेली आहे.
* या कायद्यांतर्गत इतर राज्यातील लोकांना जम्मू-काश्मीरात नोकरी मिळवण्याचा अधिकार नाही. राज्याच्या शासकीय सेवादेखील केवळ जम्मू-काश्मीरच्या उमेदवारांसाठीच आहेत. यामुळे राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी सुरक्षित राहतात.
विरोधात केले जाणारे तर्क
* जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम 370 मुळे दहशतवादाला खतपाणी मिळत आहे. या कलमाअंतर्गत पाकिस्तानी नागरिक जम्मू-काश्मीरच्या महिलेशी लग्न करून काश्मीरचे नागरिकत्व पत्करू शकतो. अशा रीतीने पाकिस्तानी दहशतवाद्यांनाही काश्मीरचे नागरिकत्व सहज मिळते.
* जम्मू-काश्मीरमध्ये माहितीचा अधिकार आणि शिक्षणाचा अधिकार यासारखे कायदे लागू होत नाहीत. कलम 370 मुळे तेथील नागरिक या कायद्यांच्या लाभांपासून वंचित राहत आहेत. तेथे माहिती अधिकार कायदा केवळ केंद्र सरकारच्या कार्यालयांसाठीच लागू होतो.
* जम्मू-काश्मीर राज्यातील अल्पसंख्याकांच्या हितांसाठी भारत सरकार कलम 370 अंतर्गत काहीच करू शकत नाही. तथापि, अल्पसंख्याकांच्या हितांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जम्मू-काश्मीर सरकारवर लावला जात आहे.

Sunday, August 4, 2019

कलम ३७० रद्द करण्याची शिफारस- अमित शाह ( यावर आपले मत नोंदवा )

अमित शहा यांनी केली मोठी घोषणा
कलम ३७० रद्द करण्याची शिफारस

नवी दिल्ली :-   केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घोषणा आज  राज्यसभेत केली. जम्मू आणि काश्मीरला विशेषाधिकार देणारे अत्यंत वादग्रस्त कलम ३७० मुळापासून काढून टाकून राज्याची पुनर्रचना करण्याची शिफारस अमित शहा यांनी संसदेत...
http://Sbsahyadri.blogspot.com

संगमेश्वरजवळच्या उक्षी येथे नदीत इको कार कोसळली (सावधान भारत :सह्याद्री नाऊ )

💥  संगमेश्वरजवळच्या उक्षी येथे  नदीत इको कार कोसळली 

▪एक जण गाडिसोबत वाहून गेला. पाच जण बाहेर फेकल्यामुळे बचावले. अर्ध्या तासापुर्विची घटना. 

▪हेरंब कदम, अतुल करंदीकर,प्रसाद शिर्के, प्रशांत म्हात्रे, पराग पेडणेकर अशा पाच जणाना वाचवण्यात यश.
करुणा मुर्ती याने सिट बेल्ट लावल्याने तो गाडिसोबत वाहून गेला.

▪हे सर्वजण दुपारी उक्षी येथील धबधब्यावर गेले होते. रत्नागिरीत परतत असताना वळणाचा अंदाज न आल्याने गाडी १०० फुट खोल नदीत कोसळली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून हे सर्व जिंदाल कंपनीचे कर्मचारी वर्ग होते.

Saturday, August 3, 2019

मैत्री दिनाच्या कवितेतुन दिलेल्या शुभेच्छा(सावधान भारत:सह्याद्री नाऊ)


तुझ्याबरोबरचे क्षणोक्षणीच्या आठवणी ह्या सतत वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणे असतात.
वारा आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण,हळुवार मनाला स्पर्श करून जातात अशा तुझ्या मैत्रीच्या आठवणी.

तुझी मैत्री म्हणजे एक जीवनप्रवास.
तुझी मैत्री म्हणजे सुख-दुःखाची साथ.
तुझी मैत्री म्हणजे देवाकडून न मागता मिळालेली अमूल्य भेट.
तुझी मैत्री म्हणजे राधेला कृष्णाची साथ.
तुझी मैत्री म्हणजे चंद्राच्या प्रकाशाला चांदण्याची साथ.
तुझी मैत्री म्हणजे श्वासाला हृदयाची साथ.
तुझी मैत्री म्हणजे मासा ही जेवढा पाण्यावर विश्वास ठेवतो तशी.
तुझी मैत्री म्हणजे अनेक आठवणींच्या वळणाचा घाट.
तुझ्या मैत्री बद्दल वर्णन ही शब्दांत सुचत नाही अशी जगावेगळी.
तुझी माझी मैत्री अशीच प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जावी.
माझी ईश्वराकडे एकच प्रार्थना तू आयुष्यभर अशीच सुखी रहावी।

माझ्याकडून शुद्ध आणि प्रेमळ मैत्रीच्या आभाळभर शुभेच्छा!!
कवी अमोल गायकर (भंडारा)
(सर्व हक्क सुरक्षित)

सावधान भारत : सह्याद्री नाऊ (स्वराज्य माझ्या शिवबांचे पण आज)



खरच एक वास्तविक असा काव्यमय लेख - स्वराज्य माझ्या शिवबांचे पण आज (थोडक्यात )


एवढा सर्व असताना तुम्ही विसरलात का?
अन्यायाविरुद्ध स्वराज्य निर्माण केले शिवरायांनी ,
शे-पाचशे मावळ्यांनी लाखोंना धूर चारली ,
आणि स्वराज्याची आपल्या निर्मिती केली.
स्त्री हि एकटी असलीची  जबाबदारी शिकविली ,
अत्याचारावर “चौरंग ” हि शिक्षा पण केली.
अन्यायाविरुद्ध बंड करण्यास शिकविला.
स्वराज्यासाठी एकत्र येण्यास शिकवण दिली.
स्वराज्याशी गद्धारी करणाऱ्यांना पायदळी दिला.
माती आपली एकच आणि आपले रक्तही म्हणून
अठरापगड जातींना त्यांनी समानता हि दिली .
अन्यायकारक राज्यकर्त्याला त्यांनी शिक्षाही दिली.
महाराजांचा पराक्रम याहुनी अगणित आहे
अगदी अंधाराची खोली न मोजता येणारा.
असे आज घडतेय का?
अन्याय होतोय आम्हावर  तोंड असूनही आम्ही गप्प  का?
मारणाऱ्याला मारता येतय  तरी हाथ थांबलेत का?
पळवणाऱ्यावर अंगावर धावताना  पाय थांबलेत  का?
समोरासमोर घडतेय पहाता येतय तरी डोळे बंद का?
श्वास कोंडतोय लोकशाहीचा तरीही नाक असे सुरु का?
सुखी जगतोय तरीही आपण पैशापायी विकले गेले का?
नक्की आपण हे का आणि  काय करतोय?
महाराजांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना ,
जाती-धर्माच्या आधारे  राजकारण करणाऱ्यांना,
मातीच्या आधारावर राजकारण करणाऱ्यांना,
भडकवून दंगली करून राजकारण करणाऱ्यांना,
बेताल वक्तव्य करून राजकारण करणाऱ्यांना,
भ्रष्टाचार  करून राजकारण करणाऱ्यांना,
अशा भ्रष्ट व्यक्तींना आपण प्रोत्साहन दिले आणि देतोय
पण हे सर्व असे का घडले?
कारण अन्याय होतांना पहातोय,
भ्रष्ट कारभारामुळे गेलेले बळी पहातोय,
तरी आम्ही गप्प का ? तर
कारण आमचे रक्त सुकलेय,आटलेय
कि हे एकमेकांवर खवळणारे रक्त मेलेय
याचाहि  निर्णय लागत नाही पण
एक मात्र नक्की माणुसकीचे रक्त मात्र बाटलेय .

एक छोटीशी चारोळी 
सोडा सर्व ते झेंडे या एकाच छत्राखाली,
आवाज त्यांचा पण हक्क मागुनी मिळेना ,
तुमच्यामुळे भ्रष्ट नेत्यांची घरेही भरली ,
शिवरायांना आज येथे मावळाच दिसेना..... (अर्थ समजून घेतल्यावर जरूर समजेल )



 शब्दरचना 
लेखक -अमोल ( भंडारा ) गायकर (सर्व हक्क सुरक्षित)
हे सर्व लिहिण्याचे कारण असे कि , आजपर्यंत जे घडले ते माझ्या लेखणीतून प्रसिद्ध करतोय.
विचार जरी माझे असतिल पण कृती मात्र तुमची पाहिजे.
जरूर आवडला तर किवा नाही तर कॉमेंट करा,शेअर करा आणि आमच्या बरोबर जोडून राहण्यासाठी अवश्य SUBSCRIBE करा .








कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...