Saturday, July 28, 2018

रायगड(पोलादपूर):बस खोल दरीत कोसळून ३३ ठार

पोलादपूर: (सा.म.टा)-महाबळेश्वरला पिकनिकसाठी निघालेली दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस पोलादपूर येथील आंबेनळी घाटात ५०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३३ जण ठार झाले आहेत तर एक कर्मचारी सुदैवाने या अपघातातून बचावला आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच सर्वच यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले असून आतापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
कोकण कृषी विद्यापीठाचे हे कर्मचारी खासगी बसने पिकनिकसाठी महाबळेश्वरला निघाले होते. सकाळी साडसहा वाजता कृषी विद्यापीठातून बस रवाना झाल्यानंतर काही तासांतच पोलादपूर येथील आंबेनळी घाटात या सर्वांवर काळाचा घाला पडला. भीषण अपघातात बसचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून या अपघातातून केवळ प्रकाश सावंत-देसाई हे बचावले आहेत. काही तरी विपरीत घडत असल्याचं लक्षात येताच सावंत यांनी बसमधून उडी मारल्याने ते बचावले आणि या अपघाताची माहिती समोर आली. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर येथील काही ट्रेकर्सनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केलं असून प्रवाशांच्या बचावासाठी सर्वच यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या ठिकाणी बचावकार्य सुरू असल्याने पोलादपूर घाटात वाहतूक थांबविण्यात आली आहे. त्यामुळे घाटामध्ये वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असून वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. या अपघातात आतापर्यंत ३३ जण ठार झाल्याची माहिती जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिली.
अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत-देसाई
दरवर्षी विद्यापीठातील क्लरिकल स्टाफ पिकनिकसाठी जातो. आज सकाळी साडेसहा वाजता विद्यापीठाच्या आवारातून पिकनिकसाठी बस निघाली. त्यावेळी फोटोही काढण्यात आला. त्या फोटोतील कर्मचाऱ्यांची संख्या मोजली असता ती ३२ इतकी आहे तर अन्य दोघे चालक आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे एक संचालक डॉ. संजय भावे यांनी दिली. विद्यापीठ प्रशासनाला सकाळी साडेदहा वाजता या अपघाताची माहिती मिळाली. अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत-देसाई यांनी यांनी फोन करून ही माहिती दिल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, आमदारांना आम्ही अपघाताची माहिती दिली. आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली असून आम्ही घटनास्थळाकडे जाण्यासाठीच रवाना झालो आहोत, असेही त्यांनी सांगितले. 
ग्रामस्थांनी बस दरीत कोसळल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलादपूर आणि साताऱ्यातील सर्वच यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू केले आहे. महाबळेश्वर येथील ट्रॅकर्सना बोलावून हे बचाव कार्य सुरू आहे.
काळजाचा थरकाप उडवणारे मदतकार्याचे दृष्य 
मुसळधार बरसणारा पाऊस आणि बघ्यांनी केलेली तुफान गर्दी यामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण येत आहे. घटनास्थळी पोलिसांची अत्यंत कमी कूमक असल्याने त्यांना गर्दीला आवरण अशक्य झाल्याचं सूत्रांनी सांगितलं
दापोली बंद 
अपघाताचं वृत्त येताच रत्नागिरीवर शोककळा पसरली आहे. दापोलीत तर सर्वच बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. 
अपघातातील मृतांची नावे 
>> राजेंद्र बंडबे 
>> हेमंत सुर्वे 
>> सुनील कदम 
>>रोशन तबीब 
>> संदीप सुवरे 
>> प्रमोद जाधव 
>> विनायक सावंत 
>> गोरक्षनाथ तोंडे 
>> दत्ताराम धायगुडे 
>> रत्नाकर पागडे 
>> प्रमोद शिगवण 
>> संतोष जालगावकर 
>> शिवदास आगरे 
>> सचिन गिम्हवणेकर 
>> राजेंद्र रिसबूड 
>> सुनील साटले 
>> रितेश जाधव 
>> पंकज कदम 
>> निलेश तांबे 
>> संतोष झगडे 
>> अनिल सावके 
>> संदीप भोसले 
>> विक्रांत शिंदे 
>> सचिन गुजर 
>> राजाराम गावडे 
>> राजेश सावंत 
>> सचिन झगडे 
>> रवीकिरण साळवी 
>> संजीव झगडे 
>> सुशय बाळ 
> राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली 
शोकाकुल परिवारांसोबत माझ्या संवेदना आहेत असे ट्विट करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रद्धांजली वाहिली. 
> पोलादपूर दुर्घटनेबाबात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक 
मदतकार्यावर मुख्यमंत्र्यांची नजर 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. स्थानिक प्रशासन अपघातस्थळी सर्वतोपरी मदत करत असून वरिष्ठ अधिकारी व आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. 
राहुल यांनी व्यक्त केला शोक 
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या अपघाताबद्दल ट्विटरच्या माध्यमातून तीव्र शोक व्यक्त केला असून स्थानिक अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. 
> पोलादपूर येथील दुर्घटनेसंबंधी माहिती व मदतीसाठी संपर्क क्रमांक 
चंद्रसेन पवार, महाड तहसीलदार (८४५४९९७७४०), प्रदीप, कुडाळ (९४२२०३२२४४), प्रदीप लोकरेः नायब तहसीलदार, रोहा (९४२३०९०३०१), भाबडः नायब तहसीलदार, माणगाव (९४२२३८२०८१)
मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ४ लाखांची मदत जाहीर 
मृतदेह बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल 
> पोलादपूर दुर्घटना: रात्र झाल्याने शोधकार्य थांबवले; १७ मृतदेह बाहेर काढण्यात यश
For more information.google.facebook 


No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...