महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस तसेच माजी खासदार श्री. निलेशजी राणे यांची रत्नागिरी शहर विकास आघाडीचे उमेदवार श्री. मिलिंदजी किर यांनी सदिच्छा भेट घेतली...
➡ रत्नागिरी शहर विकास आघाडीचे उमेदवार श्री. मिलिंदजी कीर तसेच बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. राजेंद्रजी आयरे यांनी माजी खासदार श्री. निलेशजी राणे यांची भेट घेऊन होणाऱ्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीबाबत चर्चा केली त्यावेळी त्यांच्यासोबत राजन सूर्वे स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष अशोक वाडेकर शहराध्यक्ष संकेत चवंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
▪श्री. मिलिंदजी कीर यांनी त्यांच्या नगराध्यक्ष कार्यकालामध्ये रत्नागिरी शहराच्या विकासासाठी व्हिजन डोळ्यासमोर ठेवून जे कार्य केले त्या सर्व कार्याची माजी खासदार श्री. निलेशजी राणे यांना कल्पना दिली.
▪श्री. मिलिंदजी किर यांच्यासारखा सुशिक्षित, सुसंस्कृत,अभ्यासू आणि ज्याला नगरपालिकेच्या कामाची जाण आहे असा उमेदवार रत्नागिरी शहरातील जनतेला पाहिजे तसेच आज रत्नागिरी शहराला अशा नगराध्यक्षाची गरजही असल्याचे श्री. निलेशजी राणे यांनी सांगितले.
▪श्री. निलेशजी राणे यांनी श्री. मिलिंदजी कीर यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच आपल्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले असल्यामुळे आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्व कार्यकर्ते या पोटनिवडणुकीमध्ये नव्या जोषात शहर विकास आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचे कळते.
No comments:
Post a Comment