Thursday, May 7, 2020

आठ जिल्हयांसाठी रत्नागिरीतून शुक्रवार पासून 25 एस.टी. सुटणार

प्रवाशांकडे प्रशासनाची परवानगी असणे आवश्यक
रत्नागिरी | प्रतिनिधी 
लॉकडाऊन मध्ये जिल्हयात अडकलेल्या नागरिकांनी केलेल्या विनंती अर्जानुसार मंजूरी प्राप्त झालेल्यांना राज्यातील इतर जिल्हयात पाठविण्याची तयारी पूर्ण झाली असून अशा सर्वांना उद्या शुक्रवार दि. 08 मे 2020 रोजी पासून जिल्हयातील विविध बसस्थानंकावरुन एस.टी. मार्फत जाता येणार आहे. अशा एकूण 25 बसेस उद्या जिल्हयातून निघतील असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर सर्व वाहतूक बंद झाली व जिल्हयांच्या सिमा बंद झाल्या. त्यानंतर दोन वेळा लॉकडाऊनची मुदत वाढलेली आहे. याबाबत राज्यात झालेल्या निर्णयानुसार आता जिल्हयात अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाणे शक्य होणार आहे.
नागरिकांना यासाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. प्राप्त अर्जातील पहिल्या टप्प्यातील मंजूर अर्जांनुसार नागरिकांना या गाडयांमधून विविध जिल्हयांमध्ये जाण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
उद्यापासून जिल्हातील विविध बसस्थानकांमधून सिंधुदूर्ग, रायगड (अलिबाग), बुलढाणा, लातूर, भंडारा, सातारा, गोंदिया आणि अमरावती या 8 जिल्हयांना जाणाऱ्या बसेस सुटतील.
यात ज्यांच्याकडे अशा प्रवाशाची परवानगी आहे अशांनीच आपापल्या शहरातील बसस्थानकावर वेळेच्या 2 तास आधी पोहचायचे आहे. प्रत्येक प्रवाशाकडे आरोग्य तपासणी पत्र असणे अनिवार्य आहे. प्रत्येकांने मास्क वापरणे बंधनकारक आहे.
या प्रवासासाठी गाडयांचे नियोजन आणि जिल्हयातील बसस्थानकातून गाडया सुटण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
संगमेश्वर टाईम्स
(सौजन्य/आभार दैनिक प्रहार डिजिटल)

2 comments:

  1. Mumbai to mhasala, shrivardhan time table pathva na sir

    ReplyDelete
    Replies
    1. मुंबई म्हसळा संदर्भात तील योग्य टाईम टेबल प्राप्त नाही परंतु उद्या नक्की पाठवून देऊ कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका धन्यवाद संगमेश्वर टाईम्स

      Delete

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...