Wednesday, May 6, 2020

जनतेचे रक्षक खाकी वर्दीसाठी माझा लेख समर्पित....

✍️ संगमेश्वर टाईम्स संपादकीय अग्रलेख 
(जनतेनी पोलिसांचा सुद्धा विचार करावा हे जाहिर आव्हान)

जनतेचे रक्षक खाकी वर्दीसाठी माझा लेख समर्पित....

(सदर छायाचित्र हे फक्त माहितीकरिता प्रसिद्ध करीत आहोत,कृपया गैरसमज करून घेऊ नये-संगमेश्वर टाईम्स)

     वाचकांसाठी अगोदर एक चारोळी सादर करीत आहे,

कोरोनाची भीती साध्या सर्दीमध्ये
पोलिस गस्त कोरोनाच्या गर्दीमध्ये
देवळात दिसेना देव आता
दिसतोय पांढऱ्या खाकी वर्दीमध्ये !!

      खरंच पोलिस सुद्धा माणूस च आहे ना , का त्यांना संसार नाही ,त्यांना घरे नाहीत का? जगभरासहित भारत देशात सुद्धा अक्षरशः कोरोनाने महाभयानक रूप धारण करीत थैमान घातले आहे.या कोरोनाने पूर्ण जनजीवन विस्कळीत केले आहे. अशावेळी माणसांना कोरोनापासून वाचविणे च नाहीतर गुन्हेगारांपासून,दहशतवादी असू द्यात वा समाज कंटका पासून संरक्षण द्यायचे आहे ते काम उत्तम रित्या पार पाडण्याचे काम पोलिस करीत आहेत.आपण ज्यांना निवडून दिले ते लोकप्रतिनिधीमधील  20 टक्के काम करीत आहेत बाकी सर्व फुकट सोशल मीडियाचे नायक होताना दिसत आहेत. पण समाजातील खरे नायक आपण ज्यांना रिअल हिरो म्हणून संबोधू शकतो ते पोलिस. समाजातील काही समाज कंटकाना पोलिसाचे महत्व समजत नाही. काही दिवसांपूर्वी कुर्ला कमानी चा व्हिडिओ व्हायरल झाला पोलिसांवर काही समाजघातकी लोक दादागिरी दाखवित होते काही ठिकाणी तर पोलिसांवर हात उचलले  जात आहेत अशा समाज घातकी प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध व्यक्त करीत आहे.
        चीनच्या वुहान शहरांतून आलेला हा कोरोना भारत देशासहित महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. अनेकांचे या कोरोनाने बळी घेतले तर मूठभर जीवांची सुटका झाली हा कोरोना एवढ्यावरच थांबला नाही तर देश लॉकडाऊन होई पर्यंत जनतेचे जीवन विस्कळीत होईपर्यंत पसरत जातोय. हा एक जैविक दहशतवादाचा भाग म्हणता येईल. या कोरोनाचा प्रसार कसा थांबवायचा ह्याचा विचार पडला आणि वैद्यकीय यंत्रणा धावली पण बाकीच्या समुदायाचे काय तेव्हा मात्र पोलिस यंत्रणा सज्ज झाली.कडवट असले तरी सत्य आहे मानवी दहशतवादी हल्ल्यामध्ये पोलिस च आणि आता जैविक दहशतवादी हल्ल्यामध्ये पोलिस च रक्षक म्हणून धाव घेतात. नाक्या नाक्यावर पोलिस , गावागावात पोलिस हि यंत्रणा ग्रामीण भागात मनुष्यबळ कमी असूनही 24- 36 तास काम करीत जनतेचे रक्षण करीत असल्याचे दिसून येत आहेत.स्वतःचे संसार सोडून पोलिस दुसऱ्याचा संसाराला सरंक्षण देत असल्याचे दिसत आहे. मनाला एक दृश्य मला चटका देऊन गेले माझें एक मित्र पोलिस खात्यात आहे त्याना काही दिवसांपूर्वी पुत्ररत्न प्राप्त झाले आहे पण संसार सोडून अहोरात्र फक्त ड्युटी चालू आहे त्यामुळे होणारे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर सहज दिसून गेले. काही पोलिस मित्रांनी तर स्वतःच्या कुटुंबाबद्दल डोळ्यात पाणी आणून खंत व्यक्त केली.पोलिस खात्यात महिला वर्ग ही आहे आपल्या लेकराबाळांना आणि कुटुंबाला सोडून त्याही अहोरात्र काम करताना दिसून येत आहेत.माझ्या पहाण्यामध्ये असणारे पोलिस ठाणे च्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक महिला आहेत पण पुरुषाला हि लाजवेल असे कार्य ,लोकसेवा चालू आहे खरंच त्यांच्यामध्ये या रणरागिणी दुर्गेचे रूप जनहितार्थ लोकांसाठी ड्युटीवर दिसले. या कोरोना मध्ये जनतेची सेवा करीत असताना अनेक पोलिस खात्यातील व्यक्तींना कोरोना झाला काही तर मृत्यू मुखी गेले.या कोरोनामध्ये बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फिरत असताना मी या पोलिसांचे निरीक्षण केले त्यांना वेळेत जेवण नाही, अर्धवट जेवण करून ड्युटीवर पळावे लागते, झोप हि अपूर्ण मिळते, कोणाच्या चेहऱ्यावर ड्युटी करतेवेळी कुटुंबाची काळजी दिसून येते तर आठवणींची चमक दिसून येते. या कोरोनामध्ये ड्युटी करतेवेळी मी तर बाधित होणार नाही ना माझ्या कुटुंबाला काही त्रास होणार नाही अशी खंत / दुःख त्यांच्या बोलण्यातून दिसून येते. भर उन्हात उभे राहून सेवा करावी लागते.हा सर्व त्रास होऊनही हि खाकी वर्दी जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असते एवढा त्रास घेऊन शेवटी त्यांना रक्तदाब, मधुमेह अशा अनेक आजारांचा सामना करावा लागतो ,ज्यावेळी पोलिस जनतेच्या सेवेत असतात तेव्हा काही काळे धंदे वाले आपले व्यवसाय चोरून करीत असतात अशावेळी जनतेनी त्यांना सहाय्य करणे गरजेचे आहे .प्रत्येक वेळी पोलिसांना दोष देण्यात काही व्यक्ती व्यस्त असताना दिसतात" दक्ष नागरिक " बनून आपण सुद्धा कर्तव्य बजावू शकता पोलिस यंत्रणेस मदत करू शकता.या कोरोनामध्ये कृपया शासन प्रशासनाने दिलेले नियम पाळणे आणि कायद्याचा आदर करणे हेच जबाबदार नागरिकांचे कर्तव्य आहे.
     या कोरोनामध्ये आपले महाराष्ट्र पोलीस काय काम करतात याची जाणिव ठेवा..महाराष्ट्रा बाहेर जाणाऱ्यांची यादी बनवायचे काम पोलीसच करतात .रेशन चे दुकान असुद्या की दारूचे दुकान उघडले लोकांना डिस्टंस ठेवायला लावणे पोलिसच करतात ,कोरोना संशयित आढळून आला हाॅस्पीटला घेऊन जाणे पोलीसच करतात ,कोरोना संशयित मयत झाला स्मशानात घेऊन जायला पोलीस असतात ,कोरोना संशयित जागा सीलबंद करायला त्या जागी लोकांना फिरण्यास मनाई करण्यास पोलीस असतात  विनाकारण फिरणाऱ्यां वर कारवाई पण पोलीस करतात ,२४ तास चेक नाक्यावर नाकाबंदी पोलीस ठेवतात ,लॉकडाउन मध्ये कामावर जाण्यासाठी/काम चालू करण्यासाठी परवानगी देणे,VIP/VVIP आले की बंदोबस्त ठेवणे त्यांचे संरक्षण करणे पोलीस करतात,कोरोना बाधित लोकांची माहिती ठेवणे-पोलीसच ,आरोपी पकडणे,चोरी,मारामारी झाली की पोलीसच आठवतात,लोकांच्या घरातील भांडण असले तर पोलीस च मदत करतात,एखादा कोरोना रुग्णाने पलायन केले त्याचा शोध पोलिसच घेतात का तर समाजात प्रसार होऊ नये . या कोरोनाचा फायदा उचलून गुन्हेगारी नको वाढू दे यासाठी सुद्धा पोलीस पुढाकार घेतात.समाजात शांतता नांदू दे यासाठी पोलीस च महत्वाचे असतात.अशा अनेक अगणित रिअल हिरोचे काम पोलीस पूर्णपणे पार पाडण्यास समर्थ असतात .फक्त हे कर्तव्य करत असताना या कोरोनामध्ये कोणी पोलीस कर्मचारी पॉसिटीव्ह आले तर त्यांच्या पाठीशी उभे राहा कारण आजतागायत महाराष्ट्र राज्यात 300 च्या वर पोलिसांना कोरोना झालेला आणि काही मृत्युमुखी पडलेल्या घटना असतानाही हि खाकी वर्दी मागे हटताना दिसून येत नाही.पोलिस खात्याच्या ब्रीदवाक्या प्रमाणे " सद्रक्षणाय खलनिग्रहणाय " आपले पोलीस जनतेचे मित्र, रक्षक म्हणून कार्यरत आहेत. 

।। जय हिंद ।।

जय हिंद म्हणून अवश्य कमेंट करा.....
      लेख आवडला तर नक्कीच प्रसिद्ध (share) करा
लेख लिहिण्याचे कारण एवढेच की हि एक तुफानी अचूक, बिनधास्त लेखक/संपादक अमोल गायकर यांच्या निर्भिड शोधक पत्रकारितेच्या लेखणीतून वास्तविक आणि सत्य मांडण्याचा आणि जनतेपर्यंत पोलीस या कोरोनाच्या जैविक दहशतवादी लढ्यात कसे मोलाचे कार्य करतात हे पोहचविण्याचा छोटासा प्रयत्न आहे.

शब्दांकन / लेखक 
अमोल (भंडारा) गायकर 
मोबा-8898545070
(संगमेश्वर टाईम्स MAHMUL 03679)
जनतेच्या न्यायहक्कांसाठी बुलंद आवाज
लढा अस्तित्वाचा, हा वारसा निर्भिड पत्रकारितेचा
www.sbsahyadri.blogspot.com

https://www.facebook.com/संगमेश्वर-टाईम्स-104349797630784/

No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...