Monday, March 23, 2020

देवरुख पोलिस ठाणे आणि इतर अत्यावश्यक सेवा यांचे मनपूर्वक आभार आणि जनतेस आभार तसेच आवाहन(संगमेश्वर टाईम्स)

संगमेश्वर टाईम्स (न्यूज ब्लॉग)समूहाकडून आपले सर्वांचे
मनपुर्वक आभार

 🔘 भारत देशातील,महाराष्ट्र राज्यातील, रत्नागिरी जिल्हा मधील अत्यावश्यक सेवा तसेच संगमेश्वर तालुक्यातील सर्व सन्मानीय देवरुख पोलिस ठाणे आणि संगमेश्वर पोलिस ठाणे ,डॉक्टर आणि आरोग्यसेवक,रुग्णवाहिका कर्मचारी, मेडिकल पत्रकार,वृत्तपत्र प्रतिनिधी आपण आपले जीवन धोक्यात घालून आपण काम करीत आहात,आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद व  आपणा सर्वांचे आभार मानतो.
  🔘माझे संगमेश्वर टाईम्स चे वाचक, माझे संगमेश्वर तालुका वासीय आपण "जनता कर्फ्यु" पाळून घरी राहिलात या कोरोनाचा संसर्गजन्य प्रसार वाढू नये म्हणून योग्य तो प्रतिसाद दिलात. भारत देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार आणि कायद्याचा आदर ठेवून सहकार्य करताय यासाठी तुमचेही मनापासून आभार. हा कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी आपल्या जवळच्या पोलिस प्रशासन आणि आरोग्य सेवकांनी दिलेल्या नियमांचे आपण पालन करा,ज्या प्रमाणे 22 मार्च बंद पाळलात त्याचप्रमाणे आता ही सुरक्षित रहायचे असल्यास बंद पाळा, आपण स्वतःसाठी स्वतः 144 कलम लावू आणि सरकार,शासन-प्रशासन चे नियम पाळा.जेणेकरून हा वाढता कोरोना प्रसार थांबला पाहिजे अन्यथा आपली इटली आणि जर्मनी सारखी अवस्था होईल.कृपया आपण कुणीच घराबाहेर पडू नका अशी  नम्र विनंती करतो.
   मी पुन्हा एकदा आपणा सर्वाना धन्यवाद आणि आपले मनापासून आभार.  🔘🚑🚓➡️🙏
 🔘 महत्वाची सूचना आणि सस्नेह विनंती🔘
▪️जनतेनी कृपया विनाकारण गर्दी करू नये
▪️लॉक डाऊन ला गंभीरतेने घ्या,हीच काळाची गरज
▪️देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांचे सूचनांचे पालन करा
▪️आपल्या स्थानिक पोलिस ठाणे आणि अत्यावश्यक सेवेचे आभार माना पण त्यांच्या आदेशाचे,नियम व अटींचे पालन करा
▪️विनाकारण भटकणे सोडा आणि स्वतःची तसेच कुटुंबाची काळजी घ्यायची असल्यास कृपया घरीच रहा. घराबाहेर पडू नका.
▪️अजून कोरोनाचे संकट टळले नाही,हे संकट घालवायचे असेल तर सरकार, पोलिस दल आणि अत्यावश्यक सेवेने दिलेल्या सूचनांचे पालन करून कायद्याचा आदर करा,हिच काळाची गरज

आपले नम्र
अमोल गायकर
संगमेश्वर टाईम्स
http://www.sbsahyadri.blogspot.com

No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...