✍️ *संगमेश्वर टाईम्स*✍️
🗞️🗞️ 🗞️🗞️
*🗞️थोडक्यात पण महत्वाच्या बातम्या*
26 मार्च 2020 9:00am
⭕ *प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आदेशान्वये देशासह जिल्हयात सर्वत्र 14 एप्रिल 2020 पर्यंत आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये लॉकडाऊन झाले असून याची अंमलबजावणी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात आली आहे*
⭕ *रत्नागिरी जिल्हयातील ज्या कंपन्याच्या आस्थापना पूर्णपणे बंद आहेत, त्या कंपन्यामध्ये फक्त सुरक्षा, विद्युत व देखभालीसाठी कर्मचारी ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. परंतु सदर कर्मचारी कंपनी आवारात राहतील इतरत्र कोठे जाणार या अटीच्या आधीन राहून वरील मुभा देण्यात आली आहे*
⭕ *अत्यावश्यक वाहनांना पास देण्याबाबत निर्णय घेण्यात येत असून पुढील एक दोन दिवसात जिल्हयातील प्रत्येक तहसिल कार्यालयांतून अत्यावश्यक वाहनांना पास देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.*
⭕ *रत्नागिरीतून कोरोना तपासणीसाठी 34 नमुने पाठविण्यात आले होते. 2 रिजेक्ट झाले. 10 नमुने निकाल बाकी आहेत. *21 प्रकरणी अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.*
⭕ *या 21 दिवसांच्या कालावधीत खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरु ठेवून नेहमीप्रमाणे रुग्णांची तपासणी सुरु ठेवावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आले आहेत.*
⭕ *पुण्या-मुंबईहून 08 मार्च 2020 पासून नंतरच्या काळात रत्नागिरी जिल्हयात आलेल्या नागरिकांनी सक्तीने स्वत:च्या घरात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचा भंग करण्यांवर दंडणीय कारवाई करण्यात येणार आहे.*
⭕ *धान्य दुकानदारांनी अधिकचा साठा ठेवून साठबाजी करु नये. तसेच धान्य साठयाबाबत दुकानाच्या दर्शन फलक लावणे सक्तीचे करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.*
⭕ *होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.*
⭕ *पुणे: दुबईवरून पुण्यात आलेलं करोनाची लागण झालेलं दाम्पत्य १४ दिवसांत पूर्णपणे बरे झाल्यानंतर आता आणखी एक दिलासादायक बातमी आली आहे. आणखी तिघे करोनामुक्त झाले आहेत. त्यांना उद्या, गुरुवारी घरी सोडण्यात येणार आहे.*
⭕ *नाशिक: राज्यात संचारबंदी सुरू असताना मालेगाव येथे आज रात्री आठ वाजताच्या सुमारास एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. ईस्माईल व त्यांच्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन वैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्याशी हुज्जत घातली व त्यांना धक्काबुक्की केली. धक्कादायक म्हणजे आमदारांचा फोन उचलला नाही म्हणून हा सारा धुडगूस घालण्यात आला*
⭕ *नवी दिल्लीः करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर विविध पातळ्यांवर मोठे निर्णय घेतले जात आहेत. आता परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही मोठा निर्णय जाहीर केला आहे. करोनामुळे देशातील टोल नाक्यांवरील वसुली बंद करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी ट्विट करून सांगितलंय.*
⭕ *नवी दिल्लीः करोना व्हायरसा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. पण तरीही रुग्ण संख्या वाढते आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांत ५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने धोका वाढला आहे. यामुळे दिल्लीतील करोनाच्या रुग्णांची संख्या ३५वर पोहोचली आहे. करोनाचे आढळलेले पाच नवे रुग्ण हे विदेशातून परतलेले नागरिक असल्याची माहिती आहे*
⭕ *रायगड –करोना व्हायरस बाधित रूग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रायगड जिल्ह्यातील करोनाग्रस्त असलेल्या एका व्यक्तिचा रिपोर्ट आज निगेटीव्ह आल्याने त्या व्यक्तिला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.*
⭕ *देशात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 606वर पोहोचली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सायंकाळी सांगितले. त्यात 43 परराष्ट्रीय नागरिकांचा समावेश आहे. देशात मृतांची संख्या 11 वर पोहोचली आहे. योगायोगाने देशात 21 दिवस लॉकडाऊनची सुरवात बुधवारीच झाली.*
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित असून त्यांची संख्या 128 वर पोहोचली आहे. त्यापाठोपाठ केरळात 109 जणांना लागण झाली आहे.*
🔹🟤 *महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना रुग्ण वाढत आहेत* *त्यामुळे सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा,कायद्याचा आदर करा . - *संगमेश्वर टाईम्स*
अधिक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇
www.sbsahyadri.blogspot.com
आजपर्यंत 9600+ वाचकांनी वाचलेले *संगमेश्वर टाईम्स* चे डिजिटल प्रसारमाध्यम.
(तुमच्या परिसरातील बातम्या (फोटो सहित) आम्हांला 8898545070 वर व्हाट्स अप करा.
▪️संगमेश्वर टाइम्स संपादकीय मंडळ▪️

No comments:
Post a Comment