Tuesday, March 24, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी प्रतिज्ञा करा आणि इतरांना शेअर करा( वाचा संगमेश्वर टाईम्स)

मी माझा आणि माझ्या देशाचा रक्षक
(कृपया घरी रहा,कोरोना टाळा)

मी भारत देशाचा जबाबदार,सुज्ञ आणि कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून अशी प्रतिज्ञा करतो कि,
कोरोनासारखे भयानक संकट असताना मी माझा भारत देश,माझे महाराष्ट्र राज्य, माझा जिल्हा,माझा तालुका, माझे शहर,माझे गाव,माझे भारतीय बांधव, माझे कुटुंब सुरक्षित रहाण्यासाठी भारत देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पोलिस प्रशासन,जिल्हाधिकारी,आरोग्य विभाग आणि संबधित सर्व अत्यावश्यक शासकीय यंत्रणा यांनी दिलेल्या सूचना आणि अटींचे पालन करेन. या संकटांत स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेसाठी अहोरात्र कार्यरत असणारे सीमेवरील सैनिक, पोलिस प्रशासनामधील अधिकारी आणि कर्मचारी,होमगार्ड,आरोग्य सेवामधील डॉक्टर, नर्स,आया,वॉर्डबॉय, रुग्णवाहिका कर्मचारी, मेडिकल सेवा पुरविणारे व्यवस्थापन, प्रत्येक घटनांची बातमी देणारे वृत्तपत्र प्रतिनिधी आणि संपादक आणि संबंधित सर्व व्यक्ती ज्या आमची सुरक्षा करीत आहेत त्यांचा अभिमान बाळगून,त्यांचे आभार मानून,त्यांच्या या जनहितार्थ समाजकार्याला स्वतः त्यांच्या सूचनांचे पालन करण्यासाठी घरी राहून सहाय्य करेन.रस्त्यावर कुठेही फिरणार नाही,अफवांवर विश्वास ठेवणार नाही आणि अफवा पसरविणार नाही,माझ्या मुळे माझ्या बांधवांना,देशाला त्रास होईल असे बेजबाबदार वागणार नाही.स्वतःलाच नव्हे तर माझ्या कुटुंबासहित देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी, या कोरोना रोगाचा संसर्गजन्य प्रसार थांबविण्यासाठी घरी राहून सरकार, शासन-प्रशासन आणि इतर अत्यावश्यक सेवानी बजावलेल्या आदेशाचे घरी राहून पालन करेन.
 मी अशी प्रतिज्ञा करतो कि,माझ्यामुळे शासन-प्रशासन यांवर ताण येणार नाही देश धोक्यात जाणार नाही असे ठरवून तात्काळ स्वतःला स्वतः घरीच बंदी तसेच संचारबंदी कायदा लागू करून घेईन. सध्या देश लॉकडाऊन झाला आहे,संचारबंदी आहे या आदेशाचे/कायद्याचे उल्लंघन होणार नाही हि माझी जबाबदारी असेल.हा कोरोना हरेल आणि देश जिंकेल यासाठी मी शासन- प्रशासन ला सहाय्य करून "मी माझाच नव्हे तर देशाचा रक्षक म्हणून घरी राहून संसर्गजन्य प्रसार रोखेन आणि शासनाने दिलेल्या सूचना सहित कायद्याचा आदर करेन.आज देशावर ओढवलेल्या संकटाच्या अर्थात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री यांनी भारत लॉकडाऊन ची घोषणा केली आहे ती योग्य रीतीने मी त्यांचा आदेश म्हणून,आपल्या आरोग्यासाठी योग्य निर्णय म्हणून त्यांचे पालन करेन.
         मी भारत देशातील नागरिक म्हणून मी माझी जबाबदारी,मी माझे कर्तव्य,एक दक्ष नागरिक म्हणून पार पाडेन.शासन-प्रशासन यांनी दिलेल्या नियमांचे, सूचनांचे पालन करून "घरी राहून" या कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सरकार,शासन-प्रशासन यांना सहाय्य करेन.

मी माझा आणि माझ्या देशाचा रक्षक©®
★जय भारत !! जय हिंद★
संगमेश्वर टाईम्स 

No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...