Sunday, March 22, 2020

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडून महाराष्ट्र 'लॉकडाऊन'ची घोषणा ! (संगमेश्वर टाईम्स) वाचा संपूर्ण बातमी पत्र

🔘Coronavirus Impact : मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडून महाराष्ट्र 'लॉकडाऊन'ची घोषणा ! उद्या सकाळपासून राज्यात कलम 144 लागू

🔹मुंबई-कोराना व्हायरसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यास रोखण्यासाठी तसेच सर्व नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आज (रविवारी) जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होते.
यापुर्वीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर शहर हे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं होते. आज देखील कोरोनाच्या रूग्णांमध्ये महाराष्ट्रात वाढ झाली आहे. त्याचपार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र लॉकडाऊनची घोषणा केली आहे म्हणजेच उद्या सकाळपासून राज्यात कलम 144 लागू करण्याची घोषणा केली आहे.

🔘▶️कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महत्त्वाचे निर्णय

▪️ ज्या लोकांच्या हातावर होम कॉरंनटाईनचा शिक्का मारला आहे त्या लोकांनी कृपया घरी बसावं. कुटुंबियांच्या संपर्कात येऊ नये. आता हा रोग गुणाकार धारण करेल मात्र आपल्याला आता रोगाची वजाबाकी करायची आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
 
▪संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन; आज मध्यरात्रीपासून कलम १४४ लागू होईल

▪महाराष्ट्रात जमावबंदी लागू

▪रेल्वे आणि मुंबई लोकलपाठोपाठ आता राज्यातली एसटी सेवादेखील बंद; शहरातंर्गत अत्यावश्यक सेवेसाठी काही बस सुरू राहतील

▪परदेशातून उद्यापासून कोणतंही फ्लाईट येणार आहे

▪कलम १४४ नुसार, 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये

▪सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 5 टक्के कर्मचारी असतील 


संगमेश्वर टाईम्स

No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...