Tuesday, March 31, 2020


🌎 *हम ग्रुप कडून गरजू कुटुंबाना झाले धान्याचे वाटप*

💫संगमेश्वर (देवरुख प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन आहे त्यामुळे पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.राज्यात वाहतूक सुरळीत नाही त्यामध्ये हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबाला अन्नासाठी झगडायला लागतेय परंतु अशा परिस्थितीत संगमेश्वर तालुक्यात देवरुख मध्ये  हम ग्रुप कडून गरजू व्यक्तींना धान्य वाटप करण्यात आले.हम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सरताज कापडी,सारथी हॉटेल चे मालक विनित बेर्डे, जेष्ठ पत्रकार प्रमोद हर्डीकर,पत्रकार संतोष करंडे, सामाजिक कार्यकर्ते अशपाक जेठी आणि इतर कार्यकर्ते या मदतकार्यात सहभागी होते. एकमेकां सहाय्य करू अशा प्रकारे हे सर्व जेष्ठ व्यक्ती आणि तरुणांनी एकत्र येऊन हम ग्रुप च्या माध्यमातून गरजू व्यक्तींसाठी हे मदतकार्य चालू केले आहे.आजपर्यंत अनेक गरजू कुटुंबापर्यंत पोहचत या व्यक्तींनी हम ग्रुप च्या माध्यमातून धान्यवाटप करून मदत केली आहे.
*संगमेश्वर टाईम्स*

No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...