Thursday, March 26, 2020


✍️ *संगमेश्वर टाईम्स*✍️
*🗞️थोडक्यात पण महत्वाच्या बातम्या*
27मार्च 2020 9:00am
*पुणे- शहरातील एका ४० वर्षीय पुरुषाची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घेण्याची जास्त गरज आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.*
*मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा थोड्याच वेळापूर्वी ३ ने वाढून १२५ इतका झाला होता. त्यानंतर आता पुन्हा या आकड्यात ६ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे.*
*मुंबई | कोरोनाच्या चाचणीसाठी महाराष्ट्रातील सहा ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध झाली असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) त्याला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२६ मार्च) केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.*
⭕  *मुंबई: खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्याच्या सीमा बंद असल्याने इतर राज्यांतील अडकलेल्या नागरिकांची राज्य शासन काळजी घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.*
*मुंबई: करोनाला रोखण्यासाठी देशभरात प्रयत्न सुरू असून, त्यासाठी संचारबंदीचीही अमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, कांदिवलीतील पोयसर परिसरात लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्यास विरोध केल्यानं भावंडांमध्ये वाद झाला. त्यातून लहान भावाची हत्या झाल्याची घटना बुधवारी घडली. लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडू नका, अशी कळकळीची विनंती करणाऱ्या भावाशी वाद झाला. त्यातून राजेश ठाकूर ( वय - २८) यानं दुर्गेश (२१) याची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी राजेशला अटक केली आहे.*
*नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने गरीबांसाठी दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबाला पुढील तीन महिने प्रत्येकी 5 किलो, तांदूळ किंवा गहू मोफत दिला जाणार आहे. त्यासोबतच एक किलो डाळही दिली जाणार आहे. अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.*
*पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा करताच पोलिसांनी रस्त्यावर उतरताच नागरिकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. देशात अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पोलिसांचे मारहाणीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलिसांच्या या वागणुकीमुळे अनेकजण जखमी झाले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारे एका युवकाला बेदम मारहाण केल्यामुळे युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे.*
*कोरोना विषाणू साथीचा प्रभाव संपूर्ण जगावर पडला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी सुरू आहेच; पण येत्या काळात जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा वाईट परिणाम होणार आहे. सर्व प्रमुख देशांच्या आर्थिक विकासदरात घट होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. अनेक जण बेरोजगार होण्याचा धोका आहे. कोरोना महारोगराईमुळे निर्माण होणारे आर्थिक संकट अधिक भयानक असणार आहे*
*नवी दिल्ली – करोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन केले. त्यामुळे दररोजच्या गर्दीला आळा बसला असला तरी देशातील गरीब आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या उदरर्निवाहाच्या प्रश्नाने डोकं वर काढले होते. त्यावर केंद्र सरकारने गुरुवारी 1लाख 70 हजार कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्‌विट करून स्वागत केले आहे.*
*भीम जयंती*
*कोरोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच साजरी करू'*
*कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. कोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही.* *कोरोना या महामारीविरुद्ध लढण्याची ही वेळ आहे. त्यामुळे या वर्षी 14 एप्रिल रोजी येणारी भीमजयंती घरी थांबूनच साजरी करूया, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे*
💫⭕ *रोम: जगभरात करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. सुमारे १८० हून अधिक देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही पाच लाखाहून अधिक झाली आहे. तर, मृतांचा आकडा वाढला असून २२ हजारहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे.*
💫💫💫💫💫💫💫💫
🔹🟤 *महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना रुग्ण वाढत आहेत* *त्यामुळे सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा,कायद्याचा आदर करा . - *संगमेश्वर टाईम्स*
अधिक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇
www.sbsahyadri.blogspot.com
आजपर्यंत 9600+ वाचकांनी वाचलेले *संगमेश्वर टाईम्स* चे डिजिटल प्रसारमाध्यम.
▪️संगमेश्वर टाइम्स संपादकीय मंडळ▪️

No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...