Monday, March 23, 2020

रत्नागिरी जिल्ह्यात वाहनांवर निर्बंध वाचा सविस्तर बातमी पत्र

रत्नागिरी |


साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 रत्नागिरी जिल्हयासाठी लागू करण्यात येत असून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्हयातील कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतूकीने रस्त्यावर, गल्लोगल्ली या ठिकाणी सर्व प्रकारची तीनचाकी वाहने, हलकी वाहने, मध्यम वजनाची वाहने, जड वाहतुकीची वाहने यांचा प्रवास (प्रवासी व माल वाहतुक) यासाठी वापर करण्यास  23 मार्च 2020 पासून पुढील आदेश होईपर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे.
या आदेशाने खाजगी प्रवासी वाहने तसेच सर्व प्रकारच्या  रिक्षा, टॅक्सी(ऍप आधारित ओला, उबेर व तत्सम वाहनांसह) या सर्वांना वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे.
सदर आदेश खालीलबाबतीत लागू होणार नाही.
१)शासकीय/निमशासकीय वाहने व कर्मचारी यांची कर्तव्यावर असताना वापरली जाणारी खाजगी वाहने
२) तातडीचे रुग्णवाहतुक व हॉस्पीटलमधील डॉक्टर व पॅरामेडीकल स्टॉफ (फक्त कर्तव्यार्थ)
३)अत्यावश्यक सेवा (उदा. वीज, पाणी पुरवठा, दूरसंचार, अग्निशमन, बँक व एटीएम व टपाल सेवा, सांडपाणी निचरा व स्वच्छता व्यवस्थापन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या पायाभूत विकासाशी संबधित उद्योग-CNI) फक्त कर्तव्यावर व तातडीचे असल्यास.
४) जीवनावश्यक वस्तू व सेवा यांची वाहतूक
५) प्रसार माध्यम व त्यांचे प्रतिनिधी (फक्त कर्तव्यार्थ)
६)अन्न, भाजीपाला, फळे, दुध, किराणा माल इत्यादींसारख्या अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या आस्थापना
७) दवाखाने, वैद्यकीय केंद्र, औषधी दुकाने व आरोग्य विषयक सेवा पुरविणा-या आस्थापना
८) विद्युत पुरवठा, ऑईल, पेट्रोलियम व ऊर्जा संससाधने पुरविणा-या आस्थापना
९) अत्यावश्यक सेवा देणा-या आय.टी. आस्थापना
१०) जिल्हाधिकारी यांच्या वतीने परवानगी दिलेल्या व्यक्ती.
वरील नमूद 1 ते 10 सेवा पुरविणा-या  आस्थापनांच्या वाहनांना हे आदेश लागू होणार नाहीत.
वर नमूद प्रमाणे सवलत दिलेल्या अधिकारी व कर्मचारी तसेच खाजगी व्यक्ती यांनी त्यासाठी ओळखपत्र व सदर विशेष कार्यासाठी नेमणूकीबाबतचे आदेश तसेच रुग्णांनी आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे बंधनकारक असेल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आदेशीत केले आहे.
(सौजन्य-दै. प्रहार)

No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...