Tuesday, March 31, 2020

सामाजिक कार्यकर्ते संजय निवळकर आणि सुभाष मालप यांचा जनतेसाठी मदतकार्याचा स्तुत्य उपक्रम

⭕निवळीचे तरुण लोकसेवेसाठी पुढे सरसावले
⭕रत्नागिरीतील निवळी गावाला २४ तास मोफत रुग्णसेवेची व्यवस्था
⭕सामाजिक कार्यकर्ते संजय निवळकर आणि सुभाष मालप यांचा जनतेसाठी मदतकार्याचा स्तुत्य उपक्रम

_____________________________________
रत्नागिरी :जगभरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना ग्रस्तांची वाढती संख्या पाहता निवळी ग्रामपंचायतीच्या वतीने नेहमी सामाजिक कार्यात पुढे असणारे सदस्य तसेच निवळी गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री संजय सुरेश निवळकर आणि श्री सुभाष शंकर मालप यांनी रुग्णवाहीकेद्वारे गावातील वाडी-वस्तीमध्ये फिरून लोकांमध्ये कोरोना रोगाविषयी घ्यावयाची काळजी आणि शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी जनजागृती केली.तसेच ३१ मार्चपर्यंत गावासाठी २४ तास मोफत रुग्णसेवा आणि इतर सहकार्याची ,मदतीची पावले उचलली आहेत.यावेळी त्यांच्यासोबत गावचे सरपंच सौ वेदिका रावणंग ,उपसरपंच श्री विलास गावडे , ग्रामसेवक श्री कुंभार, तंटामुक्ती अध्यक्ष श्री चंद्रकांत सुतार, पोलीस पाटील श्री शितप ,श्री सचिन रावणंग ,श्री राजू निवळकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...