Wednesday, August 7, 2019

एक भयाण वास्तव....आणि महापौरावर काय कारवाई?


एक भयाण वास्तव....आणि महापौरावर काय कारवाई?


       आज शिवसेनेचे मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर संदर्भात एक व्हिडियो व्हायरल झाला आणि  Whats app आणि  Facebook तसेच इतर सोशल साईट्स च्या माध्यमातून निषेध नोंदवायला सुरुवात झाली .माझ्याकडूनही प्रथम निषेध आहे.पण मला एक गोष्ट लक्षात येते कि,जनता फक्त २ दिवस सोशल साईट्स च्या माध्यमांतून निषेध नोंदवते, कारण त्यासाठी फक्त दोन मिनटे लागतात टाईप करायला आणि नक्कीच या दोन मिनिटांनी नाक्या-नाक्यावर ,चौका-चौकात या गोष्टी चालतात.आणि त्यानंतर सर्वत्र शांत आणि नवीन विषयाचा निषेध सोशल माध्यमातून नोंदविण्यासाठी तयार होतात.खर म्हणजे सोशल मिडिया मधून मिळणाऱ्या माहितीवर खात्री जमा करून संबधित पिडीत लोकांना मदतीचा त्यांच्या सोबत राहण्याचा आधार देवून त्यावर लोकशाही मार्गाने आंदोलने करून न्याय मिळवायला पाहिजे.पण आपण पाहतो आणि त्यावर शांत बसतो......वास्तविक
         खरे म्हणजे या घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.पण आपण हा विचार केला का,या घटना आजपर्यंत अनेक ठिकाणी याच राजकारणी नेत्यांकडून घडल्या आहेत आणि आजही तेच घडत आहे याचे कारण जनता विसरते,हे त्यांना माहितीय.यापूर्वीही ठाणे मध्ये पोलिस महिलेवर हल्ला ,रत्नागिरी आणि अंबरनाथ येथे अत्याचारामध्ये अटक ,तर छेडछाडी आणि विनयभंगाच्या घटना घडल्यात (सर्वांचा संदर्भ देणे गरजेचे नाही) आज दि.०६ ऑगस्ट २०१९ रोजी परत महिला पत्रकार वर वसई मध्ये हल्ला आणि आता तर मुंबई चे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या कडून न्याय मागायला आलेल्या महिलेचा हात मूरगळला आणि धमकी दिली,अशा या घटनांचा आपण निषेध करतोय पण तो कुठे तर सोशल साईट्स वर बस्स! म्हणजे आपले आपण कर्तव्य पार पाडले याचा आनंद वाटत असेल ना .पण या घटना का घडतात याचा विचार केलात का?......जनता विसरते हे त्यांना माहितीय.
         या महाडेश्वरांनी ज्या वेळी हात मुरगळला त्यावेळी तेथे कुणी नव्हते का कोणी मर्द? का नाही त्याचा हात मुळापासून उखडून काढला नाही .अरे,आपण तर सोशल साईटवर निषेध नोंदवून फक्त कर्तव्य करतो असे वाटते पण एक जबाबदारी शिकवण मात्र तुम्ही विसरताय.छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक शिकवण दिलीय “ एकटी स्त्री हि आपली जबाबदारी आहे ” त्यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही.माझ्या शिवबांनी तर बलात्कारी नराधमांचा “ चौरंग ” केला होता  आणि आता तर युग बदलेले आहे .शिवसेना हा पक्ष शिवरायांच्या विचाराने चालतो असे म्हटले जाते मग या महिलांवर हल्ला करणाऱ्या लोकांना का संरक्षण दिले जात आहे.नावातच “ शिव ”लावले म्हणजे  कोणी महाराजांची विचारधारा अवगत करू शकत नाही.शिवबांनी केलेल्या पराक्रमाचा विसर आज जनतेला पडतोय. “छत्रपती शिवाजी महाराज ” असे नावही कोणी मुखी घेतले तरी अंगातून शहारे आजही येतात. “ अन्यायाविरुद्ध बंड हा पुकारलाच पाहिजे ” आणि न्याय मिळत नसेल मिळवावा हेही शिकवण त्यांचीच आहे.आज खरच महाराज असते तर दोन्ही हात छाटले असते.
         मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांना ओळखले जाते आणि त्यांनीच असा निंदाजनक प्रकार करावा आणि त्यांच्यावर कोणतीच कारवाई न होणे म्हणजे नक्कीच हि बाब अन्यायकारक आहेच पण अशा कृत्याला त्यांचे समर्थन किंवा खतपाणी घातल्यासारखे वाटतेय.मा.बाळासाहेबांनी जी विचारधारा राबविली ती मात्र अशा कृत्यांमुळे कुठेतरी संपुष्टात येतेय असाही भास होतोय. “मला एक शिवसैनिक म्हणाला कि,आज बाळासाहेब असते तर महापौराला गावी जावे लागले कायमचे,परत मुंबई बघितली नसती ”आता हा विचार झाला त्यांचा पण एक मात्र नक्की जनता शांत आहे हे मात्र या शिवरायांच्या मावळ्यांना कुठपर्यंत पटतेय हेही पाहूया.ज्यांच्या नावावरती राजकारण करायचे त्यांचेच विचारधारा आम्ही चालवतोय असे सांगायचे आणि अशी विटंबना करायची हे मात्र पूर्णपणे चुकीचे आहे.माझा हा लेख तर फक्त लेखणीची धार आहे कोणाला आवडेल न आवडेल पण एक भयाण वास्तव मांडण्याचा प्रयत्न चालू आहे.ज्याला आवडेल तो नक्कीच अन्यायाविरुद्ध ,या अत्याचाराविरुद्ध पेटून उठेल पण ज्यांनी हे विचार नाकारले त्यानाही आपल्या शुभेच्छा.पूर्वीचा लेखक लेखणीने मारायचा आम्ही तर या शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या मातीतील  विचारांची बीजे आहोत वेळ पडली तर नक्कीच “ षंड होण्यापेक्षा गुंड होईल ” पण या पुढे माझ्या महापुरुषांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना विरोध हा करणार आणि अशा घटनांचा निषेध करूच पण त्याबद्दल निडरपणे जनजागृती करणारच.कोणी आलाच मध्ये तर “ अफजला सारखा फाडून टाकु ” हे नक्की.
         या लेखामधून सांगण्याचा मुद्दा एवढाच कि,आता आपण पाहू कि महापौरांनी केलेल्या निंदाजनक कृत्यावर सरकार काय शिक्षा देते ती? किंवा सर्व विषय शांत होतात का तेही पाहू .विचार माझे आहेत पण कृती मात्र शिवरायांच्या विचारधारेवर करावी हि विनंती.आवडले तर नक्की शेअर करा आणि अशाच जनजागृती ला सहाय्य करा.(लवकरच पुढचे पाऊल )क्रमशः
जय शिवराय                                           (लेखक –भंडारा )








No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...