Friday, August 2, 2019

आणि आमदार नितेश राणे यांच्या एका फोनवर आरटीओ कार्यालय शुद्धीत आले.....

बातमी थेट -कणकवली वरून दमदार आमदार मा.नितेशजी राणे जी यांची 

जिल्हा परिषद अध्यक्ष, महिला व बालकल्याण सभापती, समाजकल्याण सभापती यांच्या जुन्या गाड्या निर्लेखित करण्याची परवानगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात रखडली होती. हि परवानगी नसल्यामुळे जुन्या गाड्या वापरता येत नव्हत्या तर नवीन गाड्यांची प्रशासन खरेदीही करू शकत नव्हते. त्यामुळे जि.प. अध्यक्षांसह सभापतींची गैरसोय होत होती. याची माहिती जि.प. अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी आमदार नितेश राणे यांना दिली. आमदार राणे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना त्वरीत एक फोन करून तीनही वाहनां संदर्भात विचारणा केली. या वाहनांचा तपासणी अहवाल तयार करून जिल्हा परिषदेकडे पाठविण्यास किती दिवस लागतील? याची विचारणा केली. आमदार राणे यांचा फोन होताच आरटीओ प्रशासन हडबडले आणि एका तासात तीनही वाहनांची झालेली झीज आणि ती वापरण्यास कशापद्धतीने अपात्र आहेत याचा वस्तुनिष्ठ अहवाल देऊन ही वाहने निर्लेखित करण्यास परवानगी दिली.
उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिलेल्या नाहरकत परवानगीने जिल्हा परिषदेच्या तीनही गाड्यांचा प्रश्न सुटला आहे. गेले कित्येक दिवस तपासणीच्या नावाखाली या गाड्या नेहमी सकाळी आरटीओ कार्यालयाच्या आवारात उभ्या करून ठेवल्या जात होत्या मात्र, त्या गाड्या वापरण्यास योग्य आहेत काय ? त्यांचे किलोमीटर प्रमाणे धाव संख्येचा निकष पूर्ण झाला आहे काय ? याबाबतचा अहवाल सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी तपशिलवार करून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना द्यावा लागतो. आणि त्यानुसार परिवहन अधिकाऱ्यांने हि वाहने निर्लेखित केली जाऊ शकतात कि नाही याचे नाहरकत प्रमाणपत्र देणे आवश्यक असते. मात्र, याच कामाला या कार्यालयाकडून होणाऱ्या विलंबामुळे अध्यक्ष सभापतींना जुन्या गाड्या वापरता येत नव्हत्या आणि प्रशासनाला नवीन गाड्या खरेदी करता येत नव्हत्या. या पत्रासाठी होणारा विलंब आमदार नितेश राणे यांच्या आरटीओंना केलेल्या एका फोनमुळे संपलेला आहे. त्वरीत निर्लेखनाची परवानगी मिळाल्याने प्रशासनस्तरावर कागदी घोडे कसे नाचविले जातात याचे उत्कृष्ठ उदाहरण पहावयास मिळाले आहे.
सौजन्य दैनिक प्रहार 

No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...