Thursday, August 1, 2019

चेंबूर येथे पत्रकार, सामाजिक आणि राजकीय व्यक्तींकडून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
*जग बदल घालूनी घाव....*
*सांगुन गेले मज भीमराव....*
     *आपल्या लेखनीतून शोषित, पिडीतांच्या दु:खाला वाचा फोडून तत्कालीन समाज व्यवस्थेवर प्रहार करणारे, दीन दुबळ्यांचे कैवारी, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चेंबूर येथिल संघटित पत्रकार कट्टा अर्थात जॉईंट जर्नलिस्ट ऍक्शन कमिटी येथे पेढे वाटून हा उत्सव साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमात नवनिर्माण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक आढाव, पत्रकार नंदू घोलप, पत्रकार लक्षांत  जाधव तसेच बहुजन संग्राम पत्रकार संघ कोकण प्रदेश आणि चेंबूर अध्यक्ष महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष युवक संगमेश्वर तालुका अध्यक्ष अमोल (भंडारा) गायकर त्याचप्रमाणे रिपाई(ए) चे मुंबई सचिव युवराज रामराजे आणि कार्यकर्ते सुनिल मंडा ,निलकंठ ओव्हाळे आणि अनेक सामाजिक आणि राजकिय मंडळी सामिल होते.

No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...