Tuesday, August 6, 2019

कुर्ल्यामध्ये भाजपा कार्यकर्ते आणि अमित शेलार समर्थक यांच्या कडून कलम ३७० / ३५ - अ हटवण्याच्या निर्णयावर जल्लोषात स्वागत........


कलम ३७० / ३५ - अ हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि कुर्ल्यामध्ये भाजपा युथ उपाध्यक्ष (मुंबई ) च्या अमित शेलार यांच्या सौभाग्यवती,तसेच स्माईल डिलिव्हर  फाउंडेशन च्या उपाध्यक्ष मयुरी अमित शेलार यांनी असंख्य पुरुष आणि महीला कार्यकर्त्यासह कुर्ला विधानसभा परिसरामध्ये या निर्णयाचे स्वागत जल्लोषात केले .
या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करताना खरच आमचा  आनंद द्विगुणीत झाला असून आज खऱ्या अर्थाने देशाला समानतेचे स्वातंत्र्य लाभले याचा मला अभिमान वाटतोय त्याच प्रमाणे मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि मा. केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा धाडसी निर्णय घेऊन भारतिय संविधान आणि संपूर्ण भारत देश एका तिरंग्याखाली आणला म्हणून त्यांच्या नेतृत्वाची आम्ही अभिमानाने साक्ष देऊ असे भाजपा युथ उपाध्यक्ष (मुंबई ) च्या अमित शेलार यांच्या सौभाग्यवती तसेच स्माईल डिलिव्हर  फाउंडेशन च्या उपाध्यक्ष सौ.मयुरी अमित शेलार यांनी असे आपले मत व्यक्त केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घोषणा आज राज्यसभेत केली. जम्मू आणि काश्मीरला विशेषाधिकार देणारे अत्यंत वादग्रस्त कलम ३७० मुळापासून काढून टाकून राज्याची पुनर्रचना करण्याची शिफारस अमित शहा यांनी संसदेत केली आणि आज दिनांक ०५ ऑगस्ट २०१९ सोमवार रोजी मोदी सरकारने जम्मु काश्मीर मधून कलम ३७० / ३५ - अ हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.या निर्णयामुळे
 जम्मू काश्मीरचे विभाजन अर्थात  जम्मू काश्मीर आता राज्य नसून केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर झाले त्याचप्रमाणे  लेह लडाख वेगळा झाला आणि हा  सुद्धा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित झाले एवढेच नाहीतर वेगळा झेंडा,वेगळे सविंधान,ऱाज्याच्या नियंत्रणाखाली पोलीस,दुहेरी नागरिकत्व,विधानसभा कार्यकाळ ६ वर्षे,आरटिआय कायद्यावरील बंदी,बाहेरील व्यक्तीना संपत्ती विकत घेण्यास बंदी या सर्व गोष्टी रद्द झाल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे देशभरात मोठ्या जल्लोषात स्वागत झाले.
         कुर्ला विधानसभा येथे भाजपा युथ उपाध्यक्ष (मुंबई ) च्या अमित शेलार यांच्या पत्नी तसेच स्माईल डिलिव्हर  फाउंडेशन च्या उपाध्यक्ष सौ.मयुरी अमित शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज असंख्य भाजपा कार्यकर्ते तसेच अमित शेलार समर्थक यांनी कुर्ला विधानसभा कार्यालय नेहरूनगर येथे ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक  ,फटाक्यांच्या आतिषबाजीसह तेथिल नागरिकांना पेढे वाटून आनंद साजरा केला .
                                                         











No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...