Sunday, March 22, 2020

देवरुख शहरातील गर्दी थांबली "जनता कर्फ्यु" साठी (संगमेश्वर टाईम्स) संपूर्ण बातमी आणि छायाचित्रे पहा

🔘आणि देवरुख बाजारपेठ सहित संपूर्ण शहरात तसेच साखरपा मध्ये सुद्धा शुकशुकाट



देवरुख(अमोल गायकर)- देवरुख मधील मुख्य आठवडा बाजार, बस डेपो, शिवाजी चौक, हनुमान मंदिर परिसर आणि इतर ठिकाणी नेहमीच हजारो लोकांची वर्दळ असते आज त्या ठिकाणी संपूर्ण रस्ता,परिसर निर्मनुष्य आहे. देवरुख बस डेपोत तर सर्वत्र शुकशुकाट आहे.शहरातील जनतेचा उत्तम प्रतिसाद जनहितार्थ "जनता कर्फ्यु" ला मिळतोय हे सोबतच्या छायाचित्रे वरुन दिसून येत आहे


▪️रखरखत्या उन्हामध्ये देवरुख पोलिस ठाणे आणि ग्रामीण रुग्णालयात आरोग्यसेवक यांचा जनतेसाठी लढा सुरू.
▪️"जनता कर्फ्यु" ला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण देशभरासहित महाराष्ट्र राज्यातील जनतासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत आहे.
▪️22 मार्च 2020 च्या सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत "जनता कर्फ्यु" असणार आहे,यामुळे नक्कीच गर्दीची ठिकाणी,नेहमीच्या वर्दळीच्या ठिकाणी शुकशुकाट झाल्याने कोरोनाचा संसर्गजन्य प्रसार थांबला जाईल हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम जनतेने जनतेसाठी करावा हेच आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले
▪️साखरपा मधील मुख्य आठवडा बाजार, बस डेपो येथे नेहमी वर्दळ असते आज त्या ठिकाणी संपूर्ण रस्ता,परिसर निर्मनुष्य आहे.सर्वत्र शुकशुकाट आहे.शहरातील जनतेचा उत्तम प्रतिसाद जनहितार्थ "जनता कर्फ्यु" ला मिळतोय हे सोबतच्या छायाचित्रे वरुन दिसून येत आहे
▪️जनतेने जनतेसाठी "जनता कर्फ्यु" पाळला पण याच जनतेच्या सुरक्षेसाठी मानवी देही दैवी खाकी अर्थात पोलिस ठिकठिकाणी या रखरखत्या उन्हात पहारा देताना दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे कोरोना च्या विरोधात लढा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय चे आरोग्य सेवक सुद्धा कार्यरत आहेत, संगमेश्वर टाईम्स कडून मनापासून आभार.


🔹संगमेश्वर टाईम्स🔹

Saturday, March 21, 2020

रत्नागिरी जिल्हा आणि संगमेश्वर तालुक्यात "जनता कर्फ्यु" पहा संपूर्ण बातमी छायाचित्रासहित(संगमेश्वर टाईम्स)

भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरी जिल्हा आणि संगमेश्वर तालुक्यात "जनता कर्फ्यु"
🔘संगमेश्वर टाईम्स🔘


🔹रत्नागिरी(संगमेश्वर प्रतिनिधी)-  भारत देशात तसेच  राज्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असताना भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा संसर्गजन्य प्रसार थांबविण्यासाठी जनतेला 22 मार्च ला " जनता कर्फ्यु" चे आवाहन केले होते. हा जनता कर्फ्यु सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत असेल आणि हा जनता कर्फ्यु जनतेने जनतेसाठी केलेला असेल ज्यामुळे हा भयानक कोरोनाचा संसर्गजन्य प्रसार थांबला जाईल. त्यांच्या या आवाहनाला जनतेनी सुद्धा योग्य प्रतिसाद दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर " जनता कर्फ्यु " पाळून कोरोनाचा नायनाट करण्यासाठी रत्नागिरी कर आणि संगमेश्वर वासीय सज्ज झाले.रत्नागिरीमधील कोकण रेल्वे चे ठिकाण, मुख्यमहामार्ग,पेट्रोल पंप तसेच संगमेश्वर ची मुख्य बाजारपेठ, संगमेश्वर बस डेपो तसेच देवरुख बाजारपेठ ठिकाणी सुद्धा हा " जनता कर्फ्यु" पाळून जनता योग्य प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे. सोबतच्या छायाचित्रे पहाता हा " जनता कर्फ्यु" नक्कीच यशस्वी होऊन या भयानक कोरोनाचा प्रसार थांबला जाईल हे या चित्रांवरून स्पष्ट होते.



🔹संगमेश्वर टाईम्स🔹

राहत्या घरी बनावट देशी दारू तयार करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

राहत्या घरी बनावट देशी दारू तयार करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


परभणी :  – जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या पालम शहरातील पाटील नगरात. राहत्या घरी आरोपींकडून बनावट देशी दारू बनवली जात असल्याची खात्री लायक माहिती मिळाल्याने. मिळालेल्या माहिती आधारे घटनास्थळी पोहचून बनावट देशी दारू तयार करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने हि कार्यवाही केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक शरद विपट, पोह. मधुकर चट्टे, पोह.निलेश भुजबळ , पोह.संजय शेळके, पोना.किशोर चव्हाण, पोना. सय्यद मोबीन व पोना.अरुण कांबळे यांच्या पथकाने घटनास्थळी पोचलेल्या पथकाने बनावट देशी दारू तयार करणाऱ्यावर छापा मारला. केलेल्या या कार्यवाहीत आरोपींकडून 9957 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.त्यात भरलेले 155, रिकाम्या 157 बॉटल, सिलिंग साठी लागणारे साहित्य, नऊ लिटर बनावट दारुसाठी चे मिश्रण मिळून आले.देविदास गायकवाड, केरबा वाघमारे, प्रकाश दावळबाजे, अनिकेत घोरपडे, गंगाधर जिंकलवाड या आरोपीं विरुद्ध.

पालम पोलीस ठाण्यामध्ये शनिवार, (21मार्च )रोजी गुन्हा नोंद करण्यात आला.स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या या कारवाईने.पालम शहरातील अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

दहावीचा सोमवारचा पेपर पुढं ढकलला, ३१ मार्चनंतर होणार घोषणा (संगमेश्वर टाईम्स)

दहावीचा सोमवारचा पेपर पुढं ढकलला, ३१ मार्चनंतर होणार घोषणा

दहावीचा सोमवारी होणारा भूगोल (geography exam paper) या विषयाचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (state education minister varsha gaikwad) यांनी शनिवारी दुपारी ही घोषणा केली आहे. हा पेपर पुन्हा कधी घेण्यात येईल, याची माहिती ३१ मार्च नंतर दिली जाईल, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

सध्या राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारीवी इयत्तेच्या (Ssc and hsc exam) परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा शेवटच्या टप्प्यात असताना शालेय शिक्षण मंत्रालयाने ही घोषणा केली आहे कोरोना व्हायरसचा (coronavirus) फैलाव होऊ नये म्हणून राज्य सरकारने सिनेमागृह, माॅल, शाळा-काॅलेज, धार्मिक स्थळ, खासगी कार्यालये बंद करण्याचे निर्देश दिले असतानाच दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजीत वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याचा शिक्षण विभागाचा निर्धार होता.

सावधान ! महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर… - राजेश टोपे,आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य

सावधान ! महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर…
- राजेश टोपे,आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य 

सध्या संपूर्ण देशाला कोरोनाने हादरवून सोडले आहे. देशात सर्वाधिक कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या महाराष्ट्रात आहे.
राज्यातल्या नागरिकांनो आता अधिक सावध व्हा. जे होऊ नये यासाठी सरकार धडपड करतं आहे, तेच संकट आता राज्यावर ओढावतं आहे. राज्य कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे, खुद्द आरोग्यमंत्र्यांनी यांनी याबाबत सावध केलं आहे.
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 63 वर पोहोचली आहे. रुग्णांचा हा वाढता आकडा पाहता महाराष्ट्र कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचतो आहे, असा सूचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले.
संगमेश्वर टाईम्स

जनता कर्फ्यु ।। संगमेश्वर भाजयुमो अध्यक्ष रुपेश कदम यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातीव गावात फिरत्या वाहनाने लाऊडस्पीकर मार्फत केली जनजागृती


संगमेश्वर भाजयुमो अध्यक्ष रुपेश कदम यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातीव गावात फिरत्या वाहनाने लाऊडस्पीकर मार्फत केली जनजागृती


🔘संगमेश्वर टाईम्स🔘
🔹संगमेश्वर(हातीव)- महाराष्ट्र राज्यात तसेच पूर्ण भारत देशात कोरोना ने अक्षरशः थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णांची संख्या पहाता हा रोग संसर्गजन्य असून यांची साखळी तोडायची असल्यास या रविवारी 22 मार्च ला सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत "जनता कर्फ्यु" पाळूया म्हणजे हा जनतेने जनतेसाठी लावलेला कर्फ्यु असेल जेणेकरून हि कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल अशी सूचना भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केली. जनता कर्फ्यु साठी जनजागृती करणे महत्वाचे पाहून संगमेश्वर भाजयुमो अध्यक्ष रुपेश कदम यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातीव गावात फिरत्या वाहनाने लाऊडस्पीकर मार्फत केली जनजागृती केली.
   ▪️कोरोनाच्या विरोधात हा जनता कर्फ्यु महत्वाचा असून यामुळे नक्कीच या संसर्गजन्य रोगाची लागण थांबली जाईल. या कोरोना विरोधात सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. भारत देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचना आणि अटींचे पालन करून हा " जनता कर्फ्यु" पाळणे हीच काळाची गरज आहे, असे मत श्री. कदम यांनी संगमेश्वर टाईम्स च्या प्रतिनिधी यांच्या समोर मांडले.

संगमेश्वर टाईम्स

माजी खासदार निलेश राणेंनी सरकारला मदतीचा हात पुढे केला. Indiafight corona (संगमेश्वर टाईम्स)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार निलेश राणेंनी सरकारला पुढे केला मदतीचा हात



कोकण: राज्यात कोरोना संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारला मदतीचा हात पुढे केला आहे.
कोरोना संशयितांची संख्या वाढू लागल्याने रुग्णांवर उपचारासाठी जागा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना ट्विट करून मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना बाधित रुग्णासाठी अपुरी जागा होत असेल किंवा लागणार असेल आणि आयसूलेशन विभाग व इतर कोणत्याही वैद्यकीय मदतीसाठी जागेची गरज असल्यास सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाची अंधेरी पश्चिम येथे सिंधुदुर्ग भवन मधील जागा आम्ही देऊ कधीही कळवा, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.राज्यातील कोरोना ग्रस्त व्यक्तींची वाढती लोकसंख्या पहाता या रुग्णांना आयसुलेशन जागेची कमरतरता भासू शकते.
(संगमेश्वर टाईम्स)

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...