Saturday, September 28, 2019

संगमेश्वरमधील जिवंत मुडद्याची हि कहाणी.....



संगमेश्वरमधील जिवंत मुडद्याची हि कहाणी.....

संगमेश्वर टाईम्स (लढा अस्तित्वासाठी,आवाज लोकशाहीचा,हा वारसा निर्भीड पत्रकारितेचा )
(सदर लेख हा संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून लेखक अमोल गायकर लिखित आहे)

संगमेश्वर टाईम्स चे खास संपादकीय
*शब्द मशाल*

          कोकणातील संगमेश्वर तालुका म्हटला कि,देवभूमी,स्मारक पुरातन मंदिरे आणि शिवकालिन वास्तु यांनी नटलेला एक स्वर्गच म्हणता येईल,पण या स्वर्गाला गालबोट लावण्याचे दुष्कर्म या नेत्यांनी केले आहे.संगमेश्वर मध्ये निसर्गजडित रत्नपाचूनी,हिरेजडित अशा नैसर्गिक अलंकारिक दृष्टीने समृद्ध असा तालुका म्हणून बघितले जाते.शेती पासून मोठ्या उद्योग धंद्यांसाठी सक्षम असा तालुका.संगमेश्वर तालुक्याच्या सुरुवातीपासून शेवटच्या हद्दीपर्यंत पर्यटनास उपलब्द अशी ठिकाणे.संगमेश्वर तालुक्याच्या कुशीमध्ये वसलेल्या मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ देवरूखपासून १७ किमी अंतरावर आहे. मार्लेश्वर हे एक शंकराचे मंदिर असून ते सह्याद्री पर्वतात प्राचीन गुहेत आहे. मार्लेश्वर हे एक जागृत शिवलिंग आहे, असे सांगितले जाते. गुहेला लागूनच प्रसिद्ध बारमाही धबधबा आहे.
(सदर फोटो मार्लेश्वर तीर्थक्षेत्र इथला आहे फक्त सौंदर्य संदर्भ म्हणून घेतलेला आहे.)

देवरुख गावाजवळच एका पर्वतात टिकलेश्वर हे प्रसिद्ध शिवमंदिर आहे.हे शिवमंदिर देवरुखपासून ५ किलोमीठर अंतरावर आहे.येथील टेकडीवरुन आपल्याला तीन गावे दिसतात. केदारलिंग मंदिर हे भेट देण्सायारखे ठिकाण आहे.देवरुखपासून १०किमी अंतरावर असलेल्या केतवली गावाचे हे ग्रामदैवत आहे.हे शिवमंदिर आहे. संगमेश्वर येथील प्रसिद्ध कर्णेश्वराचे मंदिर हे हेमाडपंथी शैलीचे आहे. हे मंदिर देवरुखपासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे.संगमेश्वर हे देवळांचे गाव आहे. या परिसरात सुमारे ७० पांडव कालीन देवालये आहेत. त्यातले कर्णेश्वराचे एका दगडातून कोरलेले भव्य देऊळ विशेष प्रसिद्ध आहे. ह्या महादेवाच्या देवालयात ५ पालथी ताटे कोरलेली आहेत. आख्यायिकेनुसार पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण नामक राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून हे देवालय कोरले. त्यानंतर थकून भागून ते जेवायला बसले असता कोंबडा आरवला. पांडव तसेच त्यांची ताटे पालथी टाकून उठले. देवालयात पांडवकालीन लिपीत कोरलेले लेख आहेत. जेव्हा हे लेख कोणी वाचू शकेल तेव्हा पालथी पाने सुलटी होतील आणि त्या मनुष्याला ताटांखाली लपलेले द्रव्य मिळेल, अशी समजूत आहे. कर्णेश्वराच्या देवालयाजवळ एक सूर्य मंदिर आहे..संगमेश्वर तालुक्याचे काळीज देवरुख सोळजाई ही देवरुखची ग्रामदेवता आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला ते विशाळगड किल्ला असा प्रवास करत असताना या देवळाला वेळोवेळी भेट दिली आहे.भारतातील अनेक लोकांनी या देवळाला भेट दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी देवरुखला वेळोवेळी भेट दिली आहे.तसेच शिवाजी महाराजांनी बरेचदा श्री सोळजाई मातेच्या मंदिरालाही भेट दिली आहे.रायगड आणि विशाळगड हे देवरुखपासून सर्वात जवळचे किल्ले आहेत. देवरुखमध्ये चौसोपी हे ठिकाणसुद्धा प्रसिद्ध आहे.छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात या ठिकाणी घोड्यांचा तबेला होता.कवी कलश हे तेथील सर्व व्यवस्था पाहत.देवरुख पासून जवळच अंदाजे ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य सौंदर्यात वसलेल्या ताम्हाणे गावात हि हरीहरेश्वर अर्थात भोयरे हे देवस्थान आहे. संगमेश्वर हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेला तालुका आहे. संभाजीराजांचे मुख्य ठाणे शृगारपूर हे संगमेश्वरच्या जवळच आहे.संगमेश्वर तालुका हा पर्यटनास अनकूल आहे असे जाहिर आहे.
      मुख्यत संगमेश्वर तालुक्यात स्थानिक लोकांना रोजगार म्हणून खूप सोईसुविधा उपलब्द झाल्या असत्या पण ते राहिले ते राजकारणी नेत्यांच्या राजकारणामुळे.आता संगमेश्वर तालुक्याला विकासाच्या गतीची झळ लागता लागता अधोगतीची झळ लागली आहे.पूर्वी संगमेश्वर पासून देवरुख जायचे म्हटले कि,एक वेगळाच आनंद भेटायचा.परजिल्ह्यातून लाखो लोक या संगमेश्वर ला भेट द्यायचे.पण आता ती परिस्थिती बदलली आता ओळ्ख झाली ती रस्त्यातील खड्ड्यांनी भरलेले  शहर,बेरोजगारीने तरुणाई चे स्थलांतर,नित्कृष्ट आरोग्य सेवा,सरकारी कामांचा ढिसाळ कारभार, आधुनिक जगात मोबाईल नेटवर्क चा अभाव,पाण्याने वेढलेल्या संगमेश्वर ला पाण्याचा अभाव,मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या लाकूडतोडीचा तालुका आणि इत्यादी.हे सर्व डोळ्यासमोर घडत असताना सुद्धा नागरिक शांत आहेत याचा अर्थ रक्त सुकलंय,आटलेय कि मेले याचा सुगावा ण लागू देणाऱ्या,गप्प गुमान शांत बसणाऱ्या,अन्याय होताना बघतोय तरी बंड पुकारायचा नाही.शांत बसायचे आणि दर पाच वर्षाने सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद घ्यायचा,नारळावर हाथ ठेवायचा आणि मतदान करायचे याचा अर्थ जिवंत मुडद्यासारखे जगणे जगायचे.त्रास होतोय मात्र त्यावर आवाज उठवयाचा नाही फक्त त्याचा राग घरी काढायचा.ज्यांना निवडून दिले त्यांची कायच चुकी नाही असे मी इथे मानतो कारण अन्याय सहन करणारा हा जिवंत मनुष्य मुडद्याप्रमाणे असतो हे त्यांना माहिती आहे.पितृपक्ष कार्य झाले कि मयत माणसे मुक्त होतात हे हि त्यांनी अवलंबले आहे.याच तालुक्यात मंत्री आणि आमदार अशी मोठी पदे लाभलेले नेते झाले पण आता संगमेश्वर तालुक्याकडे बघायला कोणाला फुरसत नाही.देवरुख गावात श्री.शंकर धोंडशेठ सार्दळ आणि त्यांची मुलगी विमल शंकर सार्दळ हे स्वातंत्र्यसैनिक होते. श्री. शंकर धोंडशेठ सार्दळ यांनी विनोबा भावे यांच्यासोबत भू-दान चळवळीमथ्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.शंकर सार्दळ यांनी लिला विशंभर हे कानडी साहित्य मराठीमध्ये भाषांतरित केले,असे अनेक समाजसेवक,क्रांतीकारकानी या मातीसाठी आपले जीवन खर्ची केले आहे.
      संगमेश्वर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी देवरुखला वेळोवेळी भेट दिली आहे.तसेच शिवाजी महाराजांनी बरेचदा श्री सोळजाई मातेच्या मंदिरालाही भेट दिली आहे.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरणस्पर्श झाले म्हणून देवरुख शहराला क्रांतिभूमी म्हणून पण संबोधले जाते.अनेक क्रांतिकारक यांनी भेट दिली आहे.श्री. शंकर धोंडशेठ सार्दळ यांनी विनोबा भावे यांच्यासोबत भू-दान चळवळीमथ्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.शंकर सार्दळ यांनी लिला विशंभर हे कानडी साहित्य मराठीमध्ये भाषांतरित केले.असे अनेक समाज सेवक होवून गेले.खरच त्यांच्या विचारांच्या जोडीची गरज आहे या तरुणाईला.अन्यायकारक गोष्टींवर आवाज उठवायचा नाही,त्रास होतोय तरी शांत बसायचे म्हणजे नक्कीच हि मुडद्याची लक्षणे आहेत.
          आता वेळ आली आहे ती परिवर्तन करायची आपला हक्क मागायची , आपण ज्यांना निवडून देतो ते कोणी दादा,भाई,भाऊ,साहेब नाहीत ते आपले लोकसेवक असतात.त्यांनी आपली विकासकामे करावीत हेच त्यांचे काम असते.त्यांच्या पाठी पाठी फिरून हाजी हाजी करण्यापेक्षा विकासासाठी “एकत्र होऊ आणि बदल घडवू” या तत्वावर क्रांती घडवून आणण्याची वेळ आली आहे.लाखो रुपये खर्च करून पाण्याचा प्रश्न ऐरणीवर,रोजगारीचा मुद्दा मांडून बेरोजगार तरुणांचे संख्याबळ जास्त,कोट्यावधी खर्च करून रस्ते झाले खड्डेमय,नित्कृष्ट आरोग्य सेवा,अविकसित एमआयडीसी क्षेत्र,वेळेवर न सुटणाऱ्या परिवहन मंडळाच्या गाड्या,जग चाललेय आधुनिकीकरणाकडे तरीही मोबाईल नेटवर्क चा अभाव,पर्यटनास अनकूल असून अविकसित तालुका,सरकारी कामकाजाचा ढिसाळ कारभार, अनेक गावामध्ये डांबरीकरण नाही,रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाने बोंबाबोंब,बंधारे बांधून काय उपयोग “पाणी अडवा आणि जिरवा” असे असताना “सरकारी निधी अडवा आणि जिरवा” असे चाललेय,महावितरणच्या कामांचा अविकास असे अनेक प्रश्न असताना शांत बसणारे,अन्याय सहन करणारे आणि कोणी आवाज उठवायचा प्रयत्न केला कि भावनिकदृष्ट्या शांत बसविणारे “जिवंत मुडदे” आहेत.निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्याच्या सर्वागीण विकासाची हाक देणारे नेते आणि निवडणूक जिंकल्यावर पाठ फिरवणाऱ्या नेत्यांना हि तर सवय झाली आहे आणि कोणी निवडून आला तरी त्यालाही या मुडद्याची सवय होणार हे नक्की.जोपर्यंत विकास करण्यासाठी,बदल घडविण्यासाठी,क्रांती घडवून आणत नाहीत.
एकत्र येऊ अन् क्रांती घडवू,
झुरून मरण्यापेक्षा लढून मेलेलं बर,
भ्रष्ट नेत्यांची आपण जिरवू,
पाठीशी आहेत शिव-फुले-शाहू-आंबेडकर
  
लेखक
अमोल (भंडारा)लवु गायकर-जो पर्यंत फोटोवर हार चढत नाही तो पर्यंत हार मानणार नाही
*संगमेश्वर टाईम्स*
माहिती अधिकार कार्यकर्ता  
मोबा-८८९८५४५०७०




No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...